महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीतील साई भक्ताची शिर्डीत येऊन आत्महत्या

एकनाथ पालशेतकर  हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील ढोरसाई गावचे रहीवाशी आहेत. व्यावसायेने शेतकरी असलेले  पालशेतकर १५ दिवसापूर्वी घर सोडून निघुन गेले होते. आत्महत्येपुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहुन कुटूंबाचा संपर्क क्रमांक दिला आहे.

रत्नागिरीतील साई भक्ताची शिर्डीत येऊन आत्महत्या

By

Published : Apr 9, 2019, 9:41 AM IST

Updated : Apr 9, 2019, 10:28 AM IST

अहमदनगर - शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या रत्नागिरीच्या एका भाविकाने शिर्डीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एकनाथ विष्णु पालशेतकर (वय ५९ ) असे मृताचे नाव आहे. नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल निसर्ग समोरील बोरावके यांच्या शेतात आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

रत्नागिरीतील साई भक्ताची शिर्डीत येऊन आत्महत्या

सकाळी ८ वाजता काही नागरीकांनी पोलीसांना कळवल्यानंतर ही बाब समोर आली. एकनाथ पालशेतकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील ढोरसाई गावचे रहीवाशी आहेत. व्यावसायेने शेतकरी असलेले पालशेतकर १५ दिवसापूर्वी घर सोडून निघुन गेले होते. आत्महत्येपुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहुन कुटूंबाचा संपर्क क्रमांक दिला आहे. त्यांचा अंत्यविधी शिर्डीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीनुसार पालशेतकर यांनी कौटुंबिक कारणास्तव आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे करत आहेत

Last Updated : Apr 9, 2019, 10:28 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details