शिर्डी - साई चरणी भाविक आपल्या श्रध्देने इच्छेप्रमाणे दान करतात. साई बाबांच्या मंदिरात पैसे, सोनेचांदीच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात दान दिल्या जाते. मात्र काही भाविकांनी साईचरणी अनोखे दान दिले आहे. या दानातून अनेकांचा फायदा झाला आहे. जाणून घेऊया याबद्दल ईटीव्ही भारतच्या या विशेष स्टोरीतून...
साईचरणी रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी - शिर्डीला येणारा प्रत्येक भाविक हा आपआपल्या परीने साई चरणी दान करत असतो. अनेक भाविक रोख रक्कम आणि सोने चांदी चढवतात. काही भाविक वस्तू स्वरुपात दान करतात. मात्र याच बरोबरीने साईचरणी आल्यानंतर पैश्यापेक्षा ही बहुमुल्य असलेले रक्तदान करणाऱ्यांची ही संख्या मोठी ( Saibaba Santhan trust shirdi Blood Donation ) आहे. साईभक्तांनी केलेल्या रक्तदानाची पैशात तुलना करणे योग्य होणार नाही. मात्र भाविकांनी गेल्या वीस वर्षात केलेल्या रक्ताची पैशात तुलना केली तर तब्बल 6 कोटी 30 लाख 39 हजार रुपयांची रक्तदान भाविकांनी केले आहे. यातील निम्मे अर्थात 3 कोटी 62, लाख 47,700 रुपयांचा रक्त मोफत रुग्णांना पुरवल्या गेले आहे.
वीस वर्षात 4 लाखाहून अधिक पिशव्या जमा - शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी कडून मोठ्या प्रमाणात रक्तदान केले जाते. त्यामुळे साई संस्थानकडून आता दर्शन रांगे जवळच रक्तदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रक्तासारखे बहुमुल्य दान करणाऱ्या भाविकांना व्हीआयपी दर्शनाबरोबरच साईंची उदी आणि प्रसाद देवुनही गौरविण्यात येत आहे. साई संस्थानच्या रक्तपेढीत वीस वर्षात 1 लाख 50 हजार 583 रक्त पिशव्यांचे संकलन झाले. साईनाथ रक्त पेढीद्वारे रुग्णांना होल ह्युमन ब्लड आणि ब्लड कंपोनंटच्या पिशव्या दिल्या जातात. जमा झालेल्या 80 टक्के हे ब्लड कंपोनटच्या स्वरुपात दिल्या गेले. त्याचा हिशोब केला तर वीस वर्षात तब्बल 4 लाख 30 हजारांच्या वर रक्त घटकांच्या पिशव्या दिल्या गेल्या आहेत. यामुळे लाखोंचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.
2000 मध्ये झाली होती रक्त संकलन केंद्राची स्थापना - साईबाबांनी आपल्या हयातीत अनेक रुग्णावर उपचार करत त्यांना बरे केले. साईंचा रुग्ण सेवेचा हा वारसा आजही शिर्डीत राबविला जातो. साई संस्थान येथे दोन रुग्णालये चालवते. तेथे देशभरातील रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. याच बरोबरीने शिर्डीत सन 2000 साली रक्त संकलन आणि साठवणुक केंद्राची सुरुवात करण्यात आली होती. यामुळे साईसंस्थानच्या आणि परिसरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्याच्या रक्तपुरवठ्याची मोठी सोय उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा -Maharashtra weather forecast : 'या' तारखेला विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता