महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशात सुखशांती नांदावी यासाठी शिर्डीच्या साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन - साईलक्ष्मी यज्ञ

Sai Lakshmi Yajna: साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्र्स्ट शिर्डी यांच्या वतीनं आज मकर संक्रांतीच्या औचित्यावर साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन शिर्डी येथे करण्यात आलं होतं. (Saibhakt Lakshmibai Shinde Trust) देशात आणि जगात सुखशांती नांदावी, तसेच सुजलाम सुफलाम पर्जन्यमान राहावं, (Makar Sankranti 2024 Shirdi) यासाठी गेल्या 25 वर्षांपासून या यज्ञाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा 101 यजमानांनी यज्ञाला हजेरी लावली. (Hosts Attendance)

Sai Lakshmi Yajna
साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 9:38 PM IST

साईलक्ष्मी यज्ञाविषयी माहिती देताना आयोजक

शिर्डी (अहमदनगर)Sai Lakshmi Yajna:मकर संक्रातीच्या पर्वावर साईबाबांच्या शिर्डीत नवविद्या भक्तीचं प्रतिक म्हणून आज महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशात आणि जगात सुखशांती नांदावी, तसेच सुजलाम सुफलाम पर्जन्यमान राहावं, यासाठी गेल्या 25 वर्षांपासून शिर्डीतील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात येतं. (Shirdi Saibaba)

देशविदेशाती भाविक सहभागी:यंदाचा वर्षी 101 यजमान या यज्ञासाठी बसले होते. साईबाबांनी आपल्या अंतिम समयी तत्कालीन भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविद्या भक्ती म्हणून नऊ नाणी दिली होती. याच भक्तीच्या माध्यमातून हा यज्ञ केला जातो. पौराहित्य करत यज्ञ प्रज्वलित करून आहुती दिली जाते. महत्त्वाचं म्हणजे या यज्ञात देशातूनच नव्हे तर विदेशातील देखील भाविक सहभागी होतात.


101 यजमान बसले यज्ञाला:गेल्या 25 वर्षांपासून साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं शिर्डीत साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात येतं. हैदराबाद, दिल्ली, मुंबई, युपी, गुजरात, चेन्नई अशा अनेक राज्यासह विदेशातील देखील भाविक या यज्ञासाठी शिर्डीत दाखल झाले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल 101 यजमान या यज्ञासाठी बसले असल्याची माहिती आयोजक अरुण गायकवाड यांनी दिली आहे.

मागील वर्षी 108 यजमान बसले होते यज्ञाला: गेल्या 25 वर्षांपासून साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्र्स्ट शिर्डी यांच्या वतीने शिर्डीत साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात येते. दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे यज्ञासाठी भाविकांना येता आले नसल्याने, यज्ञ ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला होता. मात्र आता सगळे सुरळीत सुरू झाल्याने यंदा भाविकांना या यज्ञासाठी शिर्डीत येता आले आहे. आज देशातूनच नव्हे तर, विदेशातून देखील भाविक या यज्ञासाठी शिर्डीत दाखल झाले आहे. मागील वर्षी तब्बल 108 यजमान या यज्ञासाठी बसले होते, अशी माहिती आयोजक अरुण गायकवाड यांनी दिली आहे.

साईबाबांचा चाहता वर्ग मोठा : शिर्डीतील साईबाबांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिण भारतातील भाविक देखील साईंना प्रचंड मानतात, त्यांची उपासना करतात. हे लक्षात घेता शिर्डी येथे प्रत्येक सणाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. दरवर्षी लाखो भाविक साई बाबांचे दर्शन घेतात. येथे भाविकांसाठी भव्य प्रसादाची सोय केलेली असते. भाविकांनी दिलेले गुप्तदान अथवा दान हे संस्थानच्या वतीने विविध सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणले जाते.

हेही वाचा:

  1. राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव, जाणून घ्या काय आहे प्रकरण
  2. भाजपा-संघ परिवाराची महत्वाची बैठक; लोकसभा, विधानसभा निवडणुकांची 'स्ट्रॅटेजी' ठरली?
  3. मेळघाटात होतं कुमानसिंह राजाचं राज्य; किल्ल्याच्या अवशेषांची केली जाते पूजा, जाणून घ्या इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details