अहमदनगर - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. अशात १७ मार्च ते ३ मे अशा ४८ दिवसाच्या कालावधीत साईभक्तांकडून २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपयांची ऑनलाईन देणगी संस्थानाला प्राप्त झाली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबद्दलची दिली.
लॉकडाऊनमध्येही साईबाबा मंदिर मालामाल, दोन कोटींहून अधिक ऑनलाईन देणगी - sai baba trust got the fund during lockdown
१७ मार्च ते ३ मे अशा ४८ दिवसाच्या कालावधीत साईभक्तांकडून २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपयांची ऑनलाईन देणगी संस्थानाला प्राप्त झाली आहे. १ लाख १२ साईभक्तांनी संस्थानचे मोबाईल अॅप डाऊनलोड केले आहे. तर संकेतस्थळावर दररोज सुमारे ८ ते ९ हजार साईभक्त भेट देत आहेत.
साईबाबांची महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहोचली असून त्यांचा भक्त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. १७ मार्चपासून मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने याकाळात संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अॅपद्वारे थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहेत.
१ लाख १२ साईभक्तांनी संस्थानचे मोबाईल अॅप डाऊनलोड केले आहे. तर संकेतस्थळावर दररोज सुमारे ८ ते ९ हजार साईभक्त भेट देत आहेत. साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी ही साईभक्तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. जगाच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून साईभक्त संकेतस्थळाद्वारे व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन देणगी संस्थानाला पाठवत आहेत.