महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sai Baba Museum : साईभक्‍तांससाठी आनंदाची बातमी, साईबाबा संग्रहालय व ध्‍यान मंदिर भाविकांसाठी खुले - साई समाधी मंदिर

साईबाबा मंदिर परिसरात असलेले साईबाबांचे वस्तुसंग्रहालय व ध्यान मंदिर भाविकांनासाठी ( Sai Baba Museum ) साई संस्थानकडून खुले करण्यात आले आहे. या वस्तुसंग्रहालयात साईबाबांनी वापरलेले जोडे, कफनी चिलीम, उशा, गादी, रथ, पालखी, पलंग अशा अनेक वस्तू माहितीसह दर्शनार्थ ठेवण्यात आलेल्या आहेत.

शिर्डी
शिर्डी

By

Published : Feb 17, 2022, 10:56 AM IST

शिर्डी ( अहमदनगर )- साईबाबा मंदिर परिसरात असलेले साईबाबांचे वस्तुसंग्रहालय व ध्यान मंदिर भाविकांनासाठी साई संस्थानकडून खुले करण्यात आले आहे. या वस्तुसंग्रहालयात साईबाबांनी वापरलेले जोडे, कफनी चिलीम, उशा, गादी, रथ, पालखी, पलंग अशा अनेक वस्तू माहितीसह दर्शनार्थ ठेवण्यात आलेल्या आहेत.

साईबाबांनी हाताळलेल्‍या वस्‍तुंबाबत भाविकांना माहिती व्‍हावी यासाठी मंदिर परिसरातील दिक्षित वाड्यामध्‍ये हे वस्‍तू संग्रहालय उभारण्‍यात आले असुन या ठिकाणी साईबाबांनी वापरलेले जोडे, कफनी, चिलिम, उशा, गादी, रथ, पालखी, पलंग अशा अनेक वस्‍तू माहितीसह दर्शनार्थ ठेवण्‍यात आलेल्‍या आहे. तसेच साईबाबांच्‍या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ध्‍यान, साधना व नामस्‍मरण करता यावे, म्‍हणून संस्‍थानमार्फत श्री साईसत्‍यव्रत हॉलच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर नव्‍याने ध्‍यान मंदिर तयार करण्यात आलेले आहे. या ठिकाणी एका दिवसात अंदाजे 250 ते 300 भाविक ध्‍यानासाठी येतात. पण, गेल्‍या वर्षी जगभरात व देशात आलेल्‍या कोरोना विषाणूच्‍या संकटामुळे 17 मार्च, 2020 रोजी साई समाधी मंदिर बंद करण्‍यात आले होते. या दोन वर्षात कोरोना विषाणूच्‍या संकटामुळे दोन वेळा राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले होते. त्‍यानंतर जेव्‍हा साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले. तेव्‍हा साईबाबांची समाधी, द्वारकामाई, गुरुस्‍थान, ग्रामदैवत गणपती, शनिदेव, महादेव, लेंडी बागेतील श्री दत्‍त व नंददिपाचे दर्शन घेण्‍यासाठी खुले करण्‍यात येऊन एकाच रांगेतून भाविकांची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती. मात्र, यावेळी ध्‍यान मंदिर व साईबाबा वस्‍तू संग्रहालय भाविकांसाठी खुले करण्‍यात आलेले नव्‍हते. परंतु साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थांकडून वस्‍तुंचे संग्रहालय व ध्‍यान मंदिर खुले करण्‍याची मागणी वारंवार होत होती. साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थांच्‍या मागणीनुसार साईबाबा वस्‍तू संग्रहालय व ध्‍यान मंदिर भाविकांसाठी खुले करण्‍यात असल्याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

भाविकांना साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर या दोन्‍ही ठिकाणी कोरोना नियमांप्रमाणे प्रवेश दिला जाणार असून भाविकांनी कोविड नियमांप्रमाणे सामा‍जिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे व मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच ध्‍यान मंदिरात प्रवेश दिल्‍यानंतर भाविकांना अंदाजे 10 ते 15 मिनिटे ध्‍यान करता येईल. याबरोबरच भाविकांना या ध्‍यान मंदिरात पारायण व पोथी वाचन करता येणार नाही, याची सर्व भाविकांनी व ग्रामस्‍थांनी नोंद घ्‍यावी. तरी भाविकांनी कोरोनाचे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन साईबाबा वस्‍तू् संग्रहालय व ध्‍यान मंदिराचा लाभ घ्‍यावा, असे सांगून सर्व साईभक्‍तांनी व शिर्डी ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले.

हेही वाचा -Terrorist Attack on Shirdi : साईबाबांच्या शिर्डी नगरीवर दहशतवाद्यांचा डोळा ; अटक केलेल्या दहशतवाद्यांची धक्कादायक माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details