महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

No Vaccine No Religious Rituals: लस घेतल्याचं प्रमाणपत्र असेल तरच भटजी येणार पूजेला

एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Covid Vaccination) वाढवण्यासाठी राज्य सरकारचे (State Government) प्रयत्न सुरु आहेत. कोपरगाव तालुक्यातील शहाजापुर येथील एका भटजींनी लसीकरण केलेले असेल तरच धार्मिक विधीं करण्याची अट (Vaccination Certificate Is Must To Perform Religious Rituals) घातली असून, लसीकरणाच्या प्रबोधनासाठी देत असलेल्या या योगदानाचं कौतुक केल जातंय.

By

Published : Dec 12, 2021, 2:16 PM IST

कैवल्य गुरुजी
कैवल्य गुरुजी

शिर्डी (अहमदनगर)-एककीकडे शंभर कोटी लसीकरण (100 Crore Vaccination) केल्याचा जल्लोष साजरा केला जात असतांना दुसरीकडे मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी काही किलोमीटर पायी प्रवास करुन उदीष्ट पूर्ण करावं लागतंय. सरकारने कोरोना लसीकरण वाढावं यासाठी काही ठिकाणी सक्ती तर, काही ठिकाणी युक्त्या लढवल्या. लस नाही तर पेट्रोल नाही (No Vaccine No Petrol), लस नाही तर पगार नाही (No Vaccine No Payment), असेही प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. याच कामात आपलही योगदान असावं, लसीकरण वाढावं आणि शासनाचे नियमही पाळले जावेत, यासाठी कोपरगाव तालुक्यातल्या शहाजापुर येथील कैवल्य गुरुजींनी (Kaivalya Guruji Kopargaon) एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या घरात धार्मिक विधी करायचा असेल, तेथे लोकांनी लसीकरण केलेले पाहिजे, असा नियम त्यांनी केला आहे. लसीकरण प्रमाणपत्र (Covid Vaccination Certificate) पाहूनच ते काम स्वीकारत आहेत. यासंबंधीचा त्यांचा मेसेज समाजमाध्यमांत व्हायरल झाला असून, त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे.

लस घेतल्याचं प्रमाणपत्र असेल तरच भटजी येणार पूजेला
कैवल्य गुरुजी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पूजापाठ करतात. कोरोनाच्या काळात पूजा सांगणाऱ्या अनेकांना जीव गमावण्याची वेळ आलेली आहे. तर काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरल्याची उदाहरणे आहेत. सरकारने नियम केले असले तरी, अनेक जण ते धाब्यावर बसवून कार्यक्रम घेतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी कैवल्य गुरुजींनी स्वत:पासून सुरुवात केली आहे.गुरुजींनी धार्मिक, वैवाहिक कार्यक्रमासाठी नियमावली तयार केली आहे. ज्यांच्या घरातील सर्व व्यक्तींचा कोरोना लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस झाले आहेत, फक्त त्यांच्याच घरी धार्मिक विधीचे कार्यक्रम केले जातील. कोणत्याही पूजेपूर्वी घरातील सर्वांचे लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य राहील. विवाह करण्यापूर्वी वधू आणि वरांचे तसेच दोघांच्या आई- वडिलांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाईल. त्याशिवाय विवाहकार्य केले जाणार नाही, याची सर्व यजमानांनी नोंद घ्यावी. मला माझी व तुमची काळजी आहे म्हणून आजच लसीकरण करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details