महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जत-जामखेडमध्ये नवे 'रोहित'पर्व, भाजपच्या राम शिंदेंचा दारुण पराभव - भाजप

राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी पालकमंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव केला आहे. ४२ हजार मतांनी शिंदेंना पराभव स्विकारावा लागला.

कर्जत-जामखेडमध्ये नवे 'रोहित'पर्व, भाजपच्या राम शिंदेंचा दारुण पराभव

By

Published : Oct 24, 2019, 10:22 PM IST

अहमदनगर - राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी पालकमंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव केला आहे. ४२ हजार मतांनी शिंदेंना पराभव स्विकारावा लागला. तब्बल २५ वर्षानंतर या मतदारसंघात मोठा बदल झाला आहे.

कर्जत-जामखेडमध्ये नवे 'रोहित'पर्व, भाजपच्या राम शिंदेंचा दारुण पराभव

देवेंद्र फडणवीस यांनी जामखेडमधील प्रचारसभेत रोहित पवार यांचा बारामतीचे पार्सल म्हणून उल्लेख केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचे हे विधान खोटे ठरवत पवार यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यांच्या विजयानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या पंचवार्षीकला या मतदारसंघात 66.04 टक्के मतदान झाले होते. तर यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. यंदा 73.98 टक्के मतदान झाले होते. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने सहा जागांवर सत्ता मिळवली असून सहकारी पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत. भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली.

रोहित यांनी गेल्या दीड-एक वर्षा पासून जनतेत जाऊन केलेली कामे, युवकांशी साधलेला संवाद, दुष्काळी परिस्थितीत टँकरने केलेला पाणी पुरवठा आणि शिस्तबद्ध यंत्रणा वापरून हा विजय साकारला असल्याचे म्हटले जात आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू असा विश्वास पवार यांनी आपल्या विजयानंतर व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details