अहमदनगर- अहमदनगर, औरंगाबाद, बीड जिल्हा हद्दीत महामार्गावर शस्त्रांचा धाक दाखवून वाहने लूटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत 5 आरोपी असून त्यापैकी 4 आरोपींना जेरबंद करण्यात जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या आरोपींकडून 10 लाख 34 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
महामार्गांवर लूटमार करणारी टोळी जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त - मुद्देमाल
अहमदनगर, औरंगाबाद, बीड जिल्हा हद्दीत महामार्गावर शस्त्रांचा धाक दाखवून वाहने लूटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
महामार्गांवर लूटमार करणारी टोळी जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
एरियल उर्फ आर्यन कांतीलाल काळे, सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले, सुनील बाबाखान भोसले, श्रावण रतन चव्हाण, हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नगर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेसह नेवासा, शेवगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या टोळीचा पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले.