महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महामार्गावर लूटमार करणारी बीड जिल्ह्यातील टोळी गजाआड; अहमदनगर गुन्हे शाखेची कारवाई - car

काही दिवसांपूर्वी औरंगाबादकडून आपल्या कारने नगरकडे येत असलेलेल्या कृष्णा मारुती कणसे यांना नगर हद्दीतील इमामपूर घाटात आरोपींनी आपली इंडिका कार आडवी घालून अडवले होते. त्यांना मारहाण करून गाडीच्या बाहेर ढकलून देऊन त्यांची कार आणि मोबाईल घेऊन पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त खबऱ्याकडून आरोपींचा मागमूस लागला.

महामार्गावर लूटमार करणारी बीड जिल्ह्यातील टोळी गजाआड

By

Published : Jun 19, 2019, 5:41 PM IST

अहमदनगर - औरंगाबाद-पुणे महामार्गावरील नगर हद्दीत चारचाकी वाहने अडवून लूटमार आणि कार चोरणारी टोळी अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या टोळीतील ४ जणांना बीडच्या कालिकानगर भागातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कार, मोबाईल असा एकूण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महामार्गावर लूटमार करणारी बीड जिल्ह्यातील टोळी गजाआड

काही दिवसांपूर्वी औरंगाबादकडून आपल्या कारने नगरकडे येत असलेलेल्या कृष्णा मारुती कणसे यांना नगर हद्दीतील इमामपूर घाटात आरोपींनी आपली इंडिका कार आडवी घालून अडवले होते. त्यांना मारहाण करून गाडीच्या बाहेर ढकलून देऊन त्यांची कार आणि मोबाईल घेऊन पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त खबऱ्याकडून आरोपींचा मागमूस लागला.

त्यानुसार पोलिसांनी बीड शहरात जाऊन आरोपींना चोरीला गेलेल्या कारसह ताब्यात घेतले. परशुराम उर्फ प्रशांत मोहन गायकवाड, इस्माईल अमीर शेख, तुकाराम अशोक पांचाळ, रामेश्वर प्रल्हाद लाटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कार, मोबाईल असा १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गणेश इंगळे, सुनील चव्हाण, रवींद्र कर्डीले, भागीनाथ पंचमुख, रवी सोनटक्के आदींच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

ABOUT THE AUTHOR

...view details