महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नगर अर्बन' बँकेवर प्रशासकाची नियुक्ती, आरबीआयच्या पथकाची बँकेला अचानक भेट

अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांची एकहाती सत्ता असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर (मल्टीस्टेट दर्जा) आरबीआयने गुरुवारी तडकाफडकी प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

माजी खासदार दिलीप गांधी नगर अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष आहेत

By

Published : Aug 2, 2019, 7:39 AM IST

अहमदनगर - माजी खासदार दिलीप गांधी यांची एकहाती सत्ता असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर (मल्टीस्टेट दर्जा) आरबीआयने गुरुवारी तडकाफडकी प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मल्टिस्टेट दर्जा असल्याने बँकेवर आरबीआयचे नियंत्रण आहे. त्यामुळे आरबीआयच्या एका पथकाने काल (गुरुवारी) बँकेला अचानक भेट दिली होती. त्यानंतर सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार दिलीप गांधी हे बँकेचे अध्यक्ष आहेत.

बँकेच्या काही कर्ज प्रकरणात अनियमितता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बँकेचा एनपीए वाढला होता. त्यामुळे आरबीआयच्या पथकाने आज बँकेच्या नगर येथील मुख्य कार्यालयाला भेट देऊन अनेक प्रकरणांची तपासणी केल्याचे समजते. त्यानंतर सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. दिलीप गांधी हे भाजपचे माजी खासदार आहेत.

अचानकपणे आरबीआयच्या पथकाने बँकेला भेट दिल्यामुळे आणि तडकाफडकी प्रशासकाची नियुक्ती झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे गांधी यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details