अहमदनगर -कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अंगात चुंबकत्व निर्माण झाल्याचा दावा नाशिक येथील एका जेष्ट नागरिकाने केला आहे. त्या बाबत आश्चर्य व्यक्त होत असतांना दूसरीकडे अंधश्रध्दा निर्मूलन समीतीच्या सदस्या रंजना गवांदे यांनी लस घेतल्याने कोणतही चुंबकत्व शरीराला निर्माण होत नसून हा केवळ हवेच्या दाबामुळे होणारा प्रकार असल्याच म्हणाल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लस घेतल्या नंतर त्यांच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकू लागल्या, हा दावा चुकीचा - रंजना गवांदे रंजना गवांदेंनी दावा काढला खोडून -
संगमनेर येथील अंधश्रध्दा निर्मूलन समीतीच्या सदस्या रंजना गवांदे यांनी त्यांचे पतीने अशोक गवांदे यांनीअद्याप एक डोस घेतला असतांना त्याच्या अंगावरही स्टिलची भांडी चिटकत असल्याचा व्हिडीओ गवांदे या प्रसिध्द करत चुंबकत्व निर्माण होत असल्याचा दावा खोडुन काढलाय. संगमनेर येथील अंधश्रध्दा निर्मूलन समीतीच्या सदस्या रंजना गवांदे यांचे पती अशोक गवांदे यांनी एक डोस घेताला आहे. मात्र, त्याच्या अंगावरही स्टिलची भांडी चिकटत असल्याचा व्हिडीओ त्यांनी प्रसिध्द करत चुंबकत्व निर्माण होत असल्याचा दावा खोडुन काढला आहे. हा दावा पुर्ण चुकीचा आहे. लसी संदर्भात असे चुकीचे दावे न करण्याचे अवाहन त्यांनी यावेळी केला. शरीरातला घाम असतांना प्लास्टीकच्या वस्तु पण चिकटतात त्या नाशिकच्या जेष्ठ नागरिकांने पायाच्या भागाजवळ का भांडी चिकटून दाखलवी नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
घाबरून न जाता लस घेण्याचे केला आवाहन -
लसीकरना बाबद अधिच्या नागरिकांनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज पसरवले गेले असल्याने नागरिक लस घेण्यास घाबरत आहेत. यामुळे अनेक नागरिक लस घेण्यास नकार देत आहे. नाशिक येथील एका जेष्ठ नागरिकाने कोरोनाची दूसरी लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकू लागल्याचा केलेला दावा चुकीचाअसून नागरिकांनी घाबरून न जाता लस घेण्याचे आवाहन यावेळी रंजना गवांदे यांनी केले आहे.