अहमदनगर - शिर्डीत आज रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येत आहे आहे. साईबाबांच्या काकड आरतीने शिर्डीत रंगपंचमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. यासाठी शिर्डीत लाखो भाविक दाखल झाले आहे.
शिर्डीत साईबाबांच्या काकड आरतीने रंगपंचमी उत्सवाला सुरुवात - शिर्डी अहमदनगर
साईबाबांच्या मूर्तीला आज सुवर्ण आभूषणाने मडवण्यात आले असून मूर्तीसह समाधीला रंगीत वस्त्र परिधान करण्यात आले आहे. आज साक्षात साईबाबा कृष्ण रुपात दिसत आहे. आपल्या जिवनात सुख आणि समाधान राहावे म्हणून रंगपंचमीला साईबाबांना कृष्ण अवतार मानून भक्त रंगपंचमी साजरी करतात.

साईबाबा संस्थानच्यावतीने साईची रंगबेरंगी रथ यात्रा आज सांयकाळी ५ वाजता शिर्डी शहरातून काढण्यात येणार आहे. या रथयात्रेमध्ये लाखो भक्त व शिर्डी ग्रामस्थ सहभागी होवून आनंद साजरा करतात. त्याकाळी साईबाबा स्वतः लहान मुलांसोबत द्वारकामाई आणि चावडीत रंगपंचमी खेळायचे. ही परंपरा आजही साईबाबा संस्थानसमवेत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी कायम ठेवली आहे.