अहमदनगर- शिर्डी साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाल्यामुळे शिर्डी ग्रामस्थांनी आजपासून शिर्डी बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला माजी पालकमंत्री राम शिंदे यांनीही पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने आपले वक्तव्य मागे घेऊन हा वाद संपवावा, असे राम शिंदेंनी सांगितले.
साई जन्मस्थळ वाद : 'शिर्डी बेमुदत बंद'ला राम शिंदेंचा पाठिंबा - Ram Shinde support for Shirdi bandh
राज्यातील कोणत्या भागाचा विकास करायचा हा राज्य सरकारचा विषय आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळावर बोलून वाद निर्माण केला आहे, असे शिंदे म्हणाले.
यावेळी शिंदे म्हणाले, शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. साई संस्थानचा विकास होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही शहानिशा न करता साईबाबांचे जन्मस्थळ घोषित केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपले विधान मागे घेण्यासाठी शिर्डी ग्रामस्थानी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला माझाही पाठिंबा आहे, असे शिंदे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शिर्डी-पाथरी वाद : नाना पटोलेंची प्रतिक्रिया...
राज्यातील कोणत्या भागाचा विकास करायचा हा राज्य सरकारचा विषय आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळावर बोलून वाद निर्माण केला आहे, असेही शिंदे म्हणाले.