महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामनवमीला शिर्डीतील साईचरणी भरभरुन दान.. ३ दिवसांत ४ कोटी १६ लाख रुपये भक्तांकडून अर्पण

भाविकानी दान स्वरूपात अर्पण केलेल्या रकमेची आज मोजणी करण्यात आली. यामध्ये  रोख स्वरुपात १ कोटी ९२ लाख दान मिळाले. मंदीर परीसरातील देणगी काऊंटर वर ९८ लाख २० हजार रुपये,  ऑनलाईन डोनेशनच्या डेबिट, क्रेडिट, चेक डीड च्या माध्यमातून १ कोटी ११ लाख ९७८ हजार रुपये, ७ लाख रुपयांचे सोने तर १ लाख ११ हजार रुपयांची चांदी साईभक्तांनी अर्पण केली आहे. वेगवेगळ्या १७ विदेशतील भक्तानि साई समधीचे दर्शन घेतले असून सुमारे ५ लाखाची विदेशी करन्सी दान स्वरुपात साईंना दान आले आहे.

रामनवमीला शिर्डीतील साईचरणी भरभरुन दान.. ३ दिवसांत ४ कोटी १६ लाख रुपये भक्तांकडून अर्पण

By

Published : Apr 17, 2019, 12:52 PM IST

अहमदनगर -रामनवमी उत्सव काळातील 3 दिवसात शिर्डीच्या साईबाबांना साईभक्तांनी सुमारे ४ कोटी १६ लाख दान दिले आहे. यात रोख रक्कम, सोने चांदी आणि वस्तु स्वरुपातील दानाचा समावेष आहे. या उत्सव काळात देशभरातून आलेल्या सुमारे २ लाखहुन अधिक भाविकानी साईबाबांचे दर्शन घेतले.

रामनवमीला शिर्डीतील साईचरणी भरभरुन दान.. ३ दिवसांत ४ कोटी १६ लाख रुपये भक्तांकडून अर्पण

भाविकानी दान स्वरूपात अर्पण केलेल्या रकमेची आज मोजणी करण्यात आली. यामध्ये रोख स्वरुपात १ कोटी ९२ लाख दान मिळाले. मंदीर परीसरातील देणगी काऊंटर वर ९८ लाख २० हजार रुपये, ऑनलाईन डोनेशनच्या डेबिट, क्रेडिट, चेक डीड च्या माध्यमातून १ कोटी ११ लाख ९७८ हजार रुपये, ७ लाख रुपयांचे सोने तर १ लाख ११ हजार रुपयांची चांदी साईभक्तांनी अर्पण केली आहे. वेगवेगळ्या १७ विदेशतील भक्तानि साई समधीचे दर्शन घेतले असून सुमारे ५ लाखाची विदेशी करन्सी दान स्वरुपात साईंना दान आले आहे.

शिर्डीचे साईबाबा, ज्यांनी आपली संपूर्ण हयात फकिरी वेशात व्यतीत करुन समाजात मानव कल्याणाची एक नवी मुहर्तमेढ रोवली, सबका मालिक एक है, या मुळमंत्राच्या आधारे सर्वजाती धर्मांना एका छताखाली आणले. या साईंच्या नगरीत सर्व धर्मिय भक्तगण एकत्र येवून बाबांना अब्जपती करत आहेत. यंदाच्या रामनवनी उत्सवात साईंच्या दरबारी गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत आपल्या यथाशक्ती नुसार आपली श्रद्धा आर्पित करत असतो. भाविकांच्या मते बाबांना एका हाताने दिले तर बाबा हजारो हाताने भरभरुन देतात. याच धारणे मुळे आज काही हजारात स्थापन झालेल्या संस्थानकडे. कोटींचे दान जमा झालेले आहे. ही सर्व रक्कम साई संस्थान सेवेतील कर्मचारी, प्रशासन, मंदिर खर्च, भाविकांच्या सुविधा, हॉस्पीटल, अन्नदान, निवासस्थाने त्याच बरोबर शिर्डीच्या विकासावर खर्च होते. साईंची महिमा आज जगभरात पोहचल्याने कधी काळी फकिराची नगरी म्हणून ओळखली जाणारी शिर्डी आता कुबेराची नगरी म्हणून ओळखली जावू लागली आहे.

सन १९२० साली सुरु झालेल्या साईबाबानच्या खात्या मध्ये १६०० रुपय होते. आज मतीला साई संस्थानची विवीध बँका, मध्ये फिक्स डिपॉजिट २२०० कोटींची आहेत. साई संस्थानकडे आज ४३० किलो सोने आणि ५००० किलो चांदी जमा आहे. ही सगळी त्या भक्तांची देन आहे जे आपल्या साईना सगळ काही मानतात.

ABOUT THE AUTHOR

...view details