अहमदनगर - रक्षाबंधनाचे औचित्य साधत शिर्डीच्या साईबाबांसाठी देशभरातून साईभक्त बहिणींनी राख्या पाठवल्या आहेत. या सर्व राख्या साईं मंदिराच्या पुजाऱ्यांनी आज साईंच्या हातात बांधल्या आहेत. राखी पौर्णिमेचा हा उत्सव शिर्डीतही मोठ्या भक्तिभावाने आणि आस्थेने साजरा केला जातो आहे.
शिर्डीत साईंच्या मंदिरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा... - rakshabandhan
रक्षाबंधनाचे औचित्य साधत शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तींसह साईभक्त बहिणींनी पाठवलेल्या राख्या साईंच्या हातात मंदीर पुजाऱ्यामार्फत बांधण्यात आली.
राखी पौर्णिमेनिमित्त अनेक बहिणींचे बंधुराज असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीला राखी बांधण्यात आली आहे. त्याच बरोबर आज स्वातंत्र्य दिन असल्याने साई मूर्तीला तिरंगी दुपट्टा घालण्यात आला आहे. आज राखी पौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
अनेक साईभक्त गुरुवारी शिर्डीत रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी आले आहेत. जे भक्त आपल्या बहिणींकडून आज राखी बांधून घेऊ शकत नाहीत, अशा भावांसाठी साईबाबा संस्थानतर्फे विद्यालयाच्या मुलींनी साईमंदिर परिसरात राखी बांधून या भक्तांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला.