अहमदनगर - दिल्लीला जाण्यासाठी उशीर झाल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संगमनेर येथे मुक्काम केला. राहुल गांधी यांनी रात्रीच्या जेवणात मराठमोळ्या पदार्थाचा आस्वाद घेतला. यात पिठलं भाकरीचा समावेश होता. तर सकाळी दही व थालपीठ याचा आस्वाद घेतल्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले.
राहुल गांधींनी संगमनेरमध्ये घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद
राहुल गांधी यांनी रात्रीच्या जेवणात मराठमोळ्या पदार्थाचा आस्वाद घेतला. यात पिठलं भाकरीचा समावेश होता. तर सकाळी दही व थालपीठ याचा आस्वाद घेतल्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले.
शुक्रवारी सकाळी दिल्लीहून निघाल्यानंतर त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यांना अर्ध्या रस्त्यातून दिल्लीला परत जावे लागले. त्यामुळे दिवसभराचा सगळा कार्यक्रम २ तास उशिराने सुरू झाला.
राहुल गांधी हे दिल्ली, बंगाल व ओडीशाचा दौरा करून संगमनेर येथे आले होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी त्यांनी संगमनेर येथे सभा घेतली. दिल्लीला जाण्यासाठी रात्री उशीर झाल्याने राहुल गांधी यांनी संगमनेरमध्ये मुक्काम केला. संगमनेरमधील एका कपड्याच्या दुकानातून त्यांनी कपडे खरेदी केले. संगमनेरमध्ये एका महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी रात्री मुक्काम केला.