मुंबई -माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांमुळे पराभव झाल्याचा आरोप करत पक्षाकडे तक्रार केली होती. आज (शुक्रवारी) भाजपची राज्यस्तरीय बैठक झाली. यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी विखे पाटील पिता-पूत्रही हजर होते. प्रत्येक पक्षात नाराजी असते तशीच भाजपमध्ये नाराजी असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे चौकशीनंतर योग्य तो निर्णय होईल असेही ते म्हणाले. मात्र, बैठकीतील चर्चेवर बोलण्यास विखे पाटलांनी नकार दिला आहे.
हेही वाचा - तामिळनाडूमध्ये भाजप कार्यकर्त्याने बांधले पंतप्रधान मोदींचे मंदिर, दररोज करतो पूजा
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्ह्याची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर होते. सुमारे तासभर ही बैठक झाली. यानंतर आधी खासदार सुजय विखे-पाटील नंतर राधाकृष्ण विखे बाहेर पडले. त्यांनी उद्या नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाची बैठक होणार असल्याचे सांगत बैठकीचा वृत्तांत राम शिंदे सांगतील असे सांगितले.
शालिनीताई विखे पाटील या काँग्रेसमध्ये आहे, असे वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले होते. या संदर्भात राधाकृष्ण यांची उद्या कमिटीमध्ये बैठक होऊन निर्णय घेतला जाईल, असेही पाटील म्हणाले. पक्षांतर्गत वादासंदर्भात माजी राम शिंदे बोलतील. प्रत्येक पक्षात ही नाराजी असते तशीच या पक्षात आहे, असे म्हणून सुजय विखे यांनी जे वक्तव्य केले होते, ते मला माहिती नसल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे-पाटील यांची बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली.
हेही वाचा - 'व्यायाम करा, धान्य दळा', दिल्लीमध्ये अनोख्या पिठाच्या गिरणीचा शोध