अहमदनगर- पृथ्वीराज चव्हाण यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. सुजय विखे-पाटील यांच्या विजयानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा युतीला मिळाल्या याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला घराच आहेर दिला. काँग्रेस पक्षात पक्ष संघटनेचे काम करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाचे दावेदार जास्त झाले असल्याचे ते यावेळी म्हणाले. पक्षहितापेक्षा स्वःहित साधण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे, त्यामुळेच राज्यात काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली.
पृथ्वीराज चव्हाणांनी आत्मपरीक्षण करावे; विखे-पाटलांचा काँग्रेसला घरचा आहेर - congress
पक्षात माझी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मला वेगळा निर्णय घ्यावा लागला असल्याचे विखे-पाटलांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या जागा का कमी झाल्या याचे त्यांनी परीक्षण करावे, असा सल्ला विखे-पाटील यांनी चव्हाणांना दिला. पक्षात माझी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मला वेगळा निर्णय घ्यावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण तालुक्याचेच नेते होऊ शकत नाही आणि राज्याचे नेते व्हायचे स्वप्न पाहताय, असा टोलाही यावेळी विखेंनी बाळासाहेब थोरातांना लगावला.
Last Updated : May 23, 2019, 6:41 PM IST