महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सर्वांच्‍या सहकार्याने सुरू झालेले प्रवरा कोविड केअर सेंटर हे सामान्‍य माणसाला आधार ठरले' - radhakrishna vikhe patil on corona

सर्वांच्‍या सहकार्याने सुरू झालेले प्रवरा कोविड केअर सेंटर हे सामान्‍य माणसाला आधार ठरले. या कोविड केअर सेंटरमधून ८०० रुग्‍णांवर मोफत उपचार झाले.

अहमदनगर कोरोना न्यूज
'सर्वांच्‍या सहकार्याने सुरु झालेले प्रवरा कोविड केअर सेंटर हे सामान्‍य माणसाला आधार ठरले'

By

Published : May 30, 2021, 6:08 PM IST

अहमदनगर - सर्वांच्‍या सहकार्याने सुरू झालेले प्रवरा कोविड केअर सेंटर हे सामान्‍य माणसाला आधार ठरले. या कोविड केअर सेंटरमधून ८०० रुग्‍णांवर मोफत उपचार झाले. कोविड योध्‍यांच्‍या माध्‍यमातून सेवा देता आल्‍याचे समाधान मोठे असल्‍याचे प्रतिपादन राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काढले.

यांची होती उपस्थिती

शिर्डी विधानसभा मतदार संघात कोविड केअर सेंटरच्‍या माध्‍यमातून रुग्‍णांना सेवा देणाऱ्या सरकारी वैद्यकीय आधिकारी, खासगी रुग्‍णालयातील डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांसह रुग्‍णवाहीका चालक, सफाई कामगार, आशा सेविका आणि नर्सिंग स्‍टाफचा कोविड योद्धा म्‍हणून सन्‍मान करण्‍यात आला. लोणी येथील प्रवरा कोविड केअर सेंटरमधील डॉक्‍टर, नर्सेस, आरोग्‍य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना शाल व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौवविण्‍यात आले. माजी मंत्री आ. अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, सभापती सौ.नंदाताई तांबे, चेअरमन नंदु राठी, भाजपाचे सरचिटनिस ऋषिकेश खर्डे, भाजयुमोचे सतिष बावके आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कोविड योध्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने ‘सेवा ही संघटन’ या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्‍य सेवांचे उपक्रम तसेच कोविड योध्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. प्रवरा कोविड सेंटरमध्‍येही मागील दोन महीन्‍यांपासून आरोग्‍य सेवा देणा-या कोविड योध्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला.

'सर्व कामाच्‍या पाठीमागे मानवतेचा दृष्‍टीकोन होता'

याप्रसंगी बोलताना विखे पाटील म्‍हणाले की, कोविडचे दुसरे संकट सर्वांनाच घाबरवून सोडणारे होते. ग्रामीण भागात या दुस-या लाटेने समाज जीवन भयभीत झाले. खासगी रुग्‍णालयात आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्‍यामुळेच प्रवरा कोविड केअर सेंटर सुरू करावे लागले. अतिशय कमी कालावधीत सर्वांच्‍या सहकार्याने सुरू झालेल्‍या सेंटरमधील ८०० रुग्‍ण आत्‍तापर्यंत यशस्‍वी उपचार घेवून घरी गेले. या सर्व कामाच्‍या पाठीमागे मानवतेचा दृष्‍टीकोन होता आणि संकटाच्‍या काळात समाजाच्‍या पाठीशी उभे राहण्‍याची प्रवरा परिवाराची परंपरा होती. या कोविड सेंटरमधून सर्व कोविड योध्‍यांनी केलेल्‍या निरपेक्ष सेवेच्‍या माध्‍यमातून समाजाला आधार देता आला हे मोठे समाधान असल्‍याचे त्‍यांनी आवर्जून नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details