अहमदनगरRadhakrishna Vikhe Patil on Pathri :शिर्डीत साईबाबा लिंबाच्या झाडाखाली प्रकटले होते. साईबाबांनी आपल्या हयातीत आपण कोणत्या समाजाचे, पंथाचे आहे हे सांगितलं नाही. त्यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. मात्र, कालांतरानं काहींनी साईच्या जन्माचा दावा करत ते परभणी जिल्ह्यातील पाथरीचे असल्याचा शोध लावला होता. मात्र, त्यास कोणताही आधार नाही.
Radhakrishna Vikhe Patil on Pathri : साईबाबा जन्मभूमी म्हणून निधी जाहीर केला असेल तर माझा विरोध, अन्यथा... - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील - पाथरी गावाला निधी
Radhakrishna Vikhe Patil on Pathri : साईबाबांची जन्मभूमी पाथरी नाहीच. पाथरी गावाच्या विकासासाठी निधी जाहीर केलाय. साईबाबांची जन्मभूमी पाथरी म्हणून विकास निधी जाहीर केला नाही. साईबाबा जन्मभूमी म्हणून निधी जाहीर केला असेल, तर माझा याला विरोध आहे असं स्पष्ट मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय.
Published : Sep 19, 2023, 8:01 PM IST
शिर्डीकरांच्या तीव्र भावना :सन 2020 मध्ये पाथरीला साईंची जन्मभूमी म्हणून शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचा मुद्दा पुढे आला होता. त्यानंतर शिर्डीकरांनी पाथरी जन्मभूमीचा दावा खोडत 19 जानेवारी 2020 ला शिर्डी बंद पुकारला होता. यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजीत पवार उपमुख्यमंत्री होते. शिर्डीकरांच्या तीव्र भावना लक्षात घेत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनं शिर्डीतील शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत बैठक झाली होती. त्यावेळी पाथरीला साईंची जन्मभूमी म्हणून नव्हे तर पाथरी तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत निधी देणार आहे, असं सरकारनं सांगितल्यानंतर शिर्डीकरांनी बंद मागे घेतला होता.
पाथरी तीर्थक्षेत्र विकास : महायुतीच्या सरकारनं औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाथरीला जवळपास शंभर कोटीचा निधी मंजूर केलाय. त्यामुळं हा निधी केवळ पाथरी तीर्थक्षेत्र विकास म्हणून साईबाबांची जन्मभूमी म्हणून दिला असेल, तर त्यास शिर्डीकर आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचाही विरोध आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना विकास निधी जाहीर केलाय. यात पाथरी गावाच्या विकासासाठी देखील निधी जाहीर करण्यात आलाय. हा निधी पाथरी गावाच्या विकासासाठी आहे. साईबाबांची जन्मभूमी म्हणून नाही. पाथरी साईबाबांची जन्मभूमी नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय.
पाथरी गावाला निधी :मागील सरकारच्या काळातही साईबाबा जन्मभूमी म्हणून पाथरी गावाला निधी जाहीर करण्यात आला होता. मात्र, मी शिर्डी ग्रामस्थांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तो निर्णय मागे घेण्यास भाग पाडलं होतं. त्यावेळी हा साईबाबा जन्मभूमीचा वाद निवळला होता. मात्र साईबाबा जन्मभूमीचा वाद वारंवार कोण काढतंय? हा वाद चर्चेतून आपल्याला थांबावावा लागले. साईबाबांचा जन्म कुठे झाला, यासंदर्भात कोणतेही पुरावे कोणाकडे नाहीत. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून हा वाद सोडवणार आहे, असं यावेळी विखे पाटील म्हणालेत. मात्र साईबाबांची जन्मभूमी, जात, धर्म, कुठून आले हे कोणालाही माहिती नाही, असा दावा शिर्डीकरांचा आहे.
हेही वाचा :
- Bhandara Scattered On Vikhe Patil : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळ्यानं गोंधळ, नेमकं काय घडलं?
- Vikhe Patil Criticized Sharad Pawar: शरद पवारांचा राजकारणासाठी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न- राधाकृष्ण विखे पाटील
- MNS Vandalise Toll Plaza : टोलनाका फोडण्याच्या सूचना राज ठाकरेंच्या मुलाने दिल्या नसतील- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील