महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला पाहिजे होता' - राधाकृष्ण विखे पाटीलांची सरकारवर टीका

समाजहिताचे कोणतेच निर्णय सरकार घेवू शकत नाही, शेतकरी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, मंत्र्यांचेच दूधसंघ असल्याने त्यांनीच सरकारचे अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही, असा आरोपही राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील

By

Published : Aug 22, 2020, 7:47 PM IST

अहमदनगर - सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. परंतु सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. यासह सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने सुरु केला आहे. यातून खरे सत्य निश्चित समोर येईल, असा विश्वास देखील त्यांनी त्यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची स्थापना केल्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

समाजहिताचे कोणतेच निर्णय सरकार घेवू शकत नाही, शेतकरी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, मंत्र्यांचेच दूधसंघ असल्याने त्यांनीच सरकारचे अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. राज्य सरकारसमोर निर्णय घेण्याचे कोणतेच धोरण नाही. शाळा उघडण्यापासून ते महाविद्यालयांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही? याबाबत सरकारकडे स्वत:ची भूमिका नसल्याने सरकार गोंधळलेल्या अवस्थेत काम करीत असल्याचा आरोपही विखेंनी केला आहे.

हेही वाचा -गणपती बाप्पा मोरया...मंगल मूर्ती मोरया...मानाच्या पहिल्या गणपती श्री कसबा गणपतीचे पालखीतून आगमन

राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना साध्या पध्दतीने करण्यात आली. कोरोना संकटाने अडचणीत आलेल्या समाज घटकांना पुन्हा नव्याने नवी उमेद देऊन सुख- समृध्दी नांदावी म्हणून गणेशाला आपण साकडे घातले, असे विखेंनी बोलताना सांगितले. यासह लोकांची श्रध्दास्थान असलेली मंदिरे उघडण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय करावा. यासह तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय पाच महीन्यांपासून बंद असल्याने अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्यासाठी सरकारने विचार करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा -हे गणराया... जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश कर, शरद पवारांचे साकडे

ABOUT THE AUTHOR

...view details