अहमदनगर - सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी दिले होते. याच आश्वासनाची आठवण नगरच्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी महाविकासआघाडी सरकारला करून दिली आहे. उद्धव ठाकरे सरकारने त्वरित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - ...म्हणून शेतकरी २०० किलोमीटर अंतर कापून थेट पोहोचला 'सिल्वर ओक' बंगल्यावर
कर्जमाफीसह शेतमालाला योग्य भाव, या मागणीसाठी देशात पहिल्यांदाच १ जुन २०१७ मध्ये शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. या संपासाठी शिर्डीच्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. या संपाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दर्शवला होता. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुणतांब्यांत येवून शेतकऱ्यांचे अभिनंदन देखील केले होते.
हेही वाचा - शेण खाऊन 'तो'करतो मातीचं सोनं
राज्यात दीर्घकाळ चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाले आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीसह पिकाला चांगल्या हमी भावाची अपेक्षा आहे.