अहमदनगर-आरएसएस ही आतंकवादी संघटना असून साध्वी प्रज्ञासिंह या संघटनेशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भारतीयांनी इमानदार राहून ठरवले पाहिजे की, आपण आतंकवादाच्या पाठीशी राहायचे का? असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगर येथील शेवगाव येथे केले. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर गायकवाड यांच्या प्रचारार्थ ते शेवगाव येथे आले असताना ते बोलत होते.
'आरएसएस सारख्या अतिरेकी संघटनांच्या पाठीशी उभे राहायचे का? हे भारतीयांनीच ठरवावं' - BJP
वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर गायकवाड यांच्या प्रचारार्थ ते शेवगाव येथे आले असताना ते बोलत होते.
साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपने उमेदवारी दिल्याच्या मुद्यावरुन आंबेडकर यांनी टीका केली. त्यांच्यासोबतच अशोक चव्हाणांवरही निशाणा साधला. अशोक चव्हाण यांनी निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. एकदा आम्हाला सत्ता द्या, या नेत्यांनी जेवढे खाल्ले आहे, तेवढे धुवुन काढू, असेही ते यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंवरही केली टीका -
प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील कडाडून टीका केली. सध्या राज ठाकरे हे विविध ठिकाणी सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमके कोणासाठी नाचत आहेत, अशी खोचक टीका आंबेकरांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली होती. मात्र, छगन भुजबळ आणि ओवेसी आमच्या विरोधात जेवढे बोलतील तेवढे ते मायनसमध्ये जातील, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. एव्हढेच नाही तर, याचा फटका समीर भुजबळ यांनाही बसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.