अहमदनगर- आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पोपट पवार यांनी 1990 पासून आपले गाव असलेल्या हिवरे बाजार या ठिकाणी सिंचनाचे आणि वनराईची जी कामे केली आहे, याचा गवगवा देशातच नाही तर विदेशातही झाला. याची दखल घेत भारत सरकारने आज पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
'30 वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले, आता पाणीदार भारतासाठी काम करणार' - हिवरे बाजार चे सरपंच पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार
पुरस्काराने ऊर्जा मिळणार, नव्या जोमाने ग्रामविकास आणि पाणीदार भारतासाठी काम करणार असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.
जल्लोष करताना पवार परिवार
30 वर्षांच्या फळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी पोपट पवार यांनी दिली आहे. पुरस्काराने ऊर्जा मिळणार, नव्या जोमाने ग्रामविकास आणि पाणीदार भारतासाठी काम करणार असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - पद्मश्री पुरस्कारांची घोषणा; पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांचा समावेश