महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस व भाजपची धोरणे शेतकरी विरोधीच, त्यामुळेच दोघांच्या विरोधात लढत - रघुनाथदादा

मी हातकणंगलेमधून अपक्ष निवडणूक लढवत असून मला विजय मिळेल असा विश्वास रघुनाथदादांनी व्यक्त केला.

रघुनाथदादा पाटील

By

Published : Mar 29, 2019, 10:58 AM IST

अहमदनगर - काँग्रेस पक्षाची धोरणे शेतकरी विरोधी राहिल्यानेच देशभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आताचे मोदी सरकार पण तेच धोरण पुढे नेत असल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे युती-आघाडी कडून शेतकऱ्यांचा-जनतेचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यामुळे आम्ही या दोन्हींच्या विरोधात लढत असल्याचे जेष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी अहमदनगर येथे सांगितले.

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे

राज्यात २० उमेदवार रिंगणात उतरवण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. अहमदनगरमध्ये संजीव भोर हे प्रस्थापितांना हरवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगताना विरोधीपक्ष नेते मुलासाठी येथे कार्यरत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत असल्याचेही ते म्हणाले.

राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नव्हे तर कारखानदारांच्या बाजूने
साखरपट्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी राजू शेट्टी यांनी कारखानदारांशी आतून हातमिळवणी केली. त्यातून उभी राहिलेली शेतकरी चळवळ विभागली गेली. कारखानदारांच्या सोयीने निर्णय घेऊन आपण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत असल्याचे चित्र राजू शेट्टींनी भासवले. आता शेट्टी थेट आघाडीत सामील झाल्याने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. मात्र यावेळी त्यांचे काही खरे नाही. मी सुद्धा हातकणंगले मधून अपक्ष निवडणूक लढवत असून मला विजय मिळेल असा विश्वास रघुनाथदादांनी व्यक्त केला. वंचित आघाडीशी आम्ही बोलणी केली होती मात्र आंबेडकरांना फक्त जातीचे राजकारण करायचे दिसत आहे. शेतकरी प्रश्न, अर्थ विषयक धोरण यावर ते काही बोलत नाहीत असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details