महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत अत्यावश्यक सेवकांनी रस्त्यावर केले पथसंचलन, नियम पाळण्याचे केले आवाहन - shirdi corona news

शिर्डी शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शासनाच्या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे, यासाठी पोलिसांनी रस्त्यांवर उतरुन जनजागृती केली.

corona in shirdi
शिर्डीत अत्यावश्यक सेवकांनी रस्त्यावर केले पथसंचलन, नियम पाळण्याचे केले आवाहन

By

Published : May 8, 2020, 8:14 AM IST

Updated : May 8, 2020, 2:49 PM IST

अहमदनगर - घरातच राहा, सुरक्षित राहा, असा संदेश देत कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचे संकेत देत शिर्डी शहरात पोलीस पथसंचलन करण्यात आले. शिर्डी शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शासनाच्या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे, यासाठी पोलिसांनी रस्त्यांवर उतरून जनजागृती केली.

पथसंचलनादरम्यान पोलीस पथक, आरोग्य विभाग, महसूल विभाग, लष्करी जवान यासह अत्यावश्यक सेवकांनी रस्त्यावर पथसंचलन केले. याप्रसंगी शिर्डीतील नागरिकांनी या अत्यावश्यक सेवकांवर पुष्पवृष्टी करत शंख वाजवत वाजून 'वंदे मातरम्', 'भारत माता की जय' आणि साईबाबांच्या घोषण देत टाळ्याच्या गजरात त्यांचे मनोधैर्य वाढवले. शिर्डीत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसून नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे. तर येवला येथील बाधित रुग्ण शिर्डीतील नातेवाईकांच्या सहवासात आल्याने श्रीरामनगर हा परिसर सील केला असून खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन करु नये. अन्यथा, कारवाई करण्यात येईल, असे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे म्हणाले आहे.

शिर्डीत अत्यावश्यक सेवकांनी रस्त्यावर केले पथसंचलन, नियम पाळण्याचे केले आवाहन
Last Updated : May 8, 2020, 2:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details