महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-पुण्यातून गावी परतणाऱ्या 400 नागरिकांना नगरच्या सीमेवर थांबवले.. प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था

लॉकडाऊननंतर शहरी भागातून गावांकडे नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुणे-मुंबईमधून आपल्या गावी परतणाऱ्या ३०० ते ४०० मजुरांना पोलिसांनी अहमदनगरच्या सीमेवर थांबवले. प्रशासनाकडून त्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

police provide food 400 Migrants in nagar
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Mar 29, 2020, 11:34 PM IST

शिर्डी (अहमदनगर)- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर शहरी भागातून गावांकडे नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुणे-मुंबई या शहरात रोजगार राहिलेला नाही, म्हणून मजूर आणि कामगार वर्ग पायी चालत आप-आपल्या गावी परतत आहे.

स्थलांतर करणाऱ्या मजुरांना प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था

मात्र आज सकाळपासून पुणे-नाशिक महामार्गावरील अहमदनगरच्या सीमेवर या मजुरांना प्रशासनाने थांबवले आहे. या मजुरांची संख्या ३०० ते ४०० असून आता प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

ABOUT THE AUTHOR

...view details