महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंटेनरने वाहतूक पोलिसाला उडवले, पोलीस गंभीर जखमी - कंटेनरने पोलिसाला उडवले

अपघातात जखमी असलेले पोलीस कर्मचारी नदीम शेख यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची घटना पहाटेच्या वेळी घडली.

police constable injured in container at ahmednagar
कंटेनरने वाहतूक पोलिसाला उडवले, पोलीस गंभीर जखमी

By

Published : Apr 23, 2020, 9:04 AM IST

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात गुरुवारी पहाटे कंटनेरने पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. यात वाहतूक शाखेचे कर्मचारी नदीम शेख हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

नदीम शेख यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातानंतर कंटनेरही पलटी झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या अपघाताबद्दल अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details