अहमदनगर- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी दिल्लीत कोरोनाचे उपचार सुरू असताना निधन झाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर गुरुवारी अहमदनगरमध्ये अमरधाम येथील विद्युतदाहिणीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत नेते दिलीप गांधी यांनी आपल्या संसदीय कारकिर्दीत नगर जिल्ह्याचे प्रश्न हिरीरीने मांडले आणि केंद्राकडून मोठा निधी आणून ते सोडवले. त्यांचे जिल्ह्यातील विकासात मोठे योगदान राहिल्याची भावना खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार पाचपुते यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भावना व्यक्त करताना गांधी यांनी केंद्राच्या अनेक योजनांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यासाठी मदत केल्याचे सांगितले. तर पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नितेश लंके यांनी गांधी हे भाजपचे असले तरी निवडणूक वगळता, त्यांनी कधीही पक्षीय राजकारण न करता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केल्याचे सांगितले.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवार पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीत निधन झाले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते सत्तर वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुळेझ एक मुलगी असा परिवार आहे.
अहमदनगर दक्षिणचे तीन वेळेला संसदेत केले प्रतिनिधित्व-