अहमदनगर -महिन्याभरात दुसऱ्यांदा झालेल्या गोळीबाराने पारनेर तालुका हादरला होता. पोलिसांनी या गोळीबाराची कसून चौकशी केली आणि अखेर सत्य बाहेर आले. यामध्ये जमावाकडून झालेल्या गोळीबारात जखमी झाल्याची तक्रार करणारा व्यक्तीच दोषी निघाला आहे.
गावठी कट्टा हाताळताना चुकून गोळी उडाली आणि त्यात तो स्वतः जखमी झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेचा ज्याप्रमाणे फर्दाफाश झाला होता. तसेच या घटनेचाही पर्दाफाश झाला आहे.
पारनेर तालुक्यातील गोळीबार प्रकरण : फिर्याद देणारा व्यक्ती निघाला आरोपी हेही वाचा...विवस्त्र करून मारहाणीचा 'तो' व्हिडिओ बनावट; 'त्या' महिलेच्या पतीची कबुली
गुरुवारी संजय पवार याने, आपण मेहुणे दादाभाऊ चव्हाण यांच्याकडे टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे जात होतो. तेव्हा सकाळी दहा वाजता गुणोरे गावच्या ओढ्यालगत चार अनोळखी इसमाचे भांडण चालू असल्याचे पाहिले. त्यातील एकाने आपल्यावर गोळीबार केला. ती गोळी आपल्या हाताला लागल्याचे पवार याने सांगितले होते.
घटना घडल्यानंतर घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी भेट दिली होती. त्यांनी या घटनेचा उलगडा केला. मात्र, यामध्ये स्वतः तक्रारदार हाच दोषी निघाला आहे.
हेही वाचा...निर्भया प्रकरण : फाशी टाळण्यासाठी दोषी मुकेशची नवी याचिका, सरकारवर केला कटाचा आरोप
पोलिसांनी सदर प्रकरणबाबत अधिक चौकशी केली. त्यावेळी वस्तुस्थिती समोर आली. पवार आणि चव्हाण हे गावठी कट्टा हाताळत होते. त्यावेळी चव्हाण यांच्याकडून गावठी कट्यातून गोळी सुटली. ती पवार यांच्या उजव्या हाताला लागली. त्यामुळे या दोघांनाही आता आरोपी बनवण्यात आले आहे. यातील चव्हाण यास अटक केली आहे, तर पवार हा शिरूर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे.