अहमदनगर - शिर्डीत दरवर्षी श्रावण महिन्यात साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून, ६ हजारापेक्षा जास्त भक्तांनी यात सहभाग घेतला आहे.
शिर्डीत साईसच्चरित पारायण सोहळ्याला सुरुवात - Saibaba
शिर्डीत श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ७ दिवस हा पारायण सोहळा चालतो.
शिर्डीमध्ये हेमाडपत लिखित साईचरित्राचे पारायण साईबाबा संस्थान व नाट्यरसिक सच यांच्यावतीने मागील २५ वर्षापासून सुरू आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ७ दिवस हा पारायण सोहळा चालतो. यात एकूण ५३ अध्याय असून, साईबाबांच्या आरतीने यास दररोज सकाळी सुरुवात होते. चरित्राचे पारायण केल्याने घरात सुख शांती, स्थैर्य व मनोबल वाढते. सुरुवातीला १५ वर्षापूर्वी यात फक्त ६० भक्तांनी भाग घेतला होता. मात्र, दरवर्षी यात दिवसेंदिवस वाढ होऊन आज हजारोंच्या संख्येने भक्त या सोहळ्यात सहभागी होत आहेत. यंदा या सोहळ्यात महिलांची सख्या जास्त असून, पारायणासाठी काही महिला माहेरी आल्या आहेत. तर कोणी आपली लहान मुले घरी ठेऊन आल्या आहेत. तर कोणाचे मोठ्या संकटातून प्राण वाचले म्हणून साईचे पारायण करत आहेत.
सबका मालिक एक चा संदेश व श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र संपूर्ण जगाला देणारे साईबाबाचे चरित्राचे पारायण केल्याने मन अगदी प्रसन्न होते. त्यामुळे अनेक भक्त या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. श्रावण महिन्यात चालणाऱ्या या महासोहळ्यास अनेक दानशूर व्यक्ती भरभरुन देणगी देतात.