महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Padmashri Rahibai Demanded to Government : पद्मश्री राहीबाई यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची शासनाकडे मागणी - ओला दुष्काळ जाहीर करण्याची शासनाकडे मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेती ही पावसावर अवलंबून असते. अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या बहुसंख्य पिकांना अतिवृष्टीचा फटका ( Crops Sown Affected by Heavy Rains ) मोठ्या प्रमाणावर बसला आहे. जोरदार पावसामुळे खरिपातील पिके हातातून जाताना दिसत आहे. त्यामुळे पद्मश्री राहीबाई यांनी शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर ( Declare Wet Drought ) करण्याची मागणी ( Padmashri Rahibais Demanded to Government ) केली आहे.

Padmashri Rahibai Demanded to Government
Padmashri Rahibai Demanded to Government

By

Published : Sep 18, 2022, 1:40 PM IST

Updated : Sep 18, 2022, 2:01 PM IST

अहमदनगर :अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या बहुसंख्य पिकांना अतिवृष्टीचा फटका ( Crops Sown Affected by Heavy Rains ) मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील पिके हातातून जाताना दिसत आहे. शेतकरी पाण्यात वाहून गेलेली पिके डोळ्यांसमोर बघताना हवालदिल झालेला आहे. मोठ्या कष्टाने आणि श्रमाने उभे केलेली भात, नागली, वरई तसेच इतर खरिपातील पिके अत्यंत नाजूक परिस्थितीत आहेत. संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची ( Declare Wet Drought ) भीती व संकट शेतकऱ्यांवर उभे ठाकले आहे. भात शेती उदध्वस्त होण्याच्या मार्गावर ( Padmashri Rahibais Demanded to Government ) आहे.

पद्मश्री राहीबाई यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची शासनाकडे मागणी

तीनही महिन्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल :आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेती ही पावसावर अवलंबून असते. सुरुवातीला पाऊस उशिरा आल्याने भात लागवडी उशिरापर्यंत सुरू होत्या. त्यामुळे सुरुवातीलाच हवामान बदलाचा फटका बसलेली शेती कशीबशी कर्ज घेऊन व उसनवारी करून शेतकऱ्यांनी उभी केली होती. परंतु, जुलै, ऑगस्ट व आता सप्टेंबर या तीनही महिन्यांमध्ये जोरदार पाऊस सातत्याने सुरू असून, शेतकऱ्यांना तोंडी आलेला घास हिरावतो की काय, हे दुःख सतावत आहे.

पद्मश्री राहीबाई यांची शासनाकडे मागणी

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची शेतीसुद्धा पावसामुळे उद्ध्वस्त :जोरदार पाऊस त्यात रोग किडींचा विविध पिकांवर वाढलेला प्रादुर्भाव याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हीच परिस्थितीत बीजमाता म्हणून देश आणि विदेशात प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची शेतीसुद्धा पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. वर्षभर गावरान आणि अस्सल गावठी बियाण्यांची मागणी त्यांच्याकडे होत असते. परंतु, चालू हंगामात कुठलेही बियाणे तयार होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर गावरान बियाणे निर्मितीचे प्रचंड मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पद्मश्री राहीबाई यांची शासनाकडे मागणी

शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी :पावसामध्ये काबाडकष्ट करून उभे केलेली पिके डोळ्यांसमोर अतिवृष्टीने झोडपून खराब झाली आहेत. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान बघून त्यांना अश्रू अनावर झाले. सर्व शेतकऱ्यांची वैफल्यग्रस्त परिस्थिती असून, शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, असे विनम्र आव्हान त्यांनी शासनाकडे केलेले आहे.

Last Updated : Sep 18, 2022, 2:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details