महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुनं ते सोनं; 'बीजमाता' राहिबाईंनी शेणामातीतील बियाण्यांवर लावला लेकरासारखा जीव - राहीबाई पोपरे बीजमाता

'बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. राहीबाई या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या रहिवासी आहेत. त्या विविध पिकांचे गावरान वाणांचे जतन करण्याचे काम करतात.

padmashri-award-winner-rahibai-popares-inspirational-journey
जुनं ते सोनं; 'बीजमाता' राहिबाईंनी शेणामातीतील बियाण्यांवर लावला लेकरासारखा जीव

By

Published : Jan 26, 2020, 11:37 AM IST

Updated : Jan 26, 2020, 7:13 PM IST

अहमदनगर -'बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील राहीबाई पोपरे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. आदिवासी कुटुंबातून येणाऱ्या राहीबाई यांनी आतापर्यंत गावरान वाण असलेल्या भात, नागली, वरई, पालेभाज्या, फळे यांच्या 52 वाणांचा अमुल्य ठेवा जतन केला आहे. 'जुनं ते सोनं' असे म्हणत राही मावशींनी संकरित भाज्या खाण्यापेक्षा गावरान भाज्या खाण्याने शरीराला चांगली ताकद मिळत असल्याचे सांगितले आहे.

जुनं ते सोनं; 'बीजमाता' राहिबाईंनी शेणामातीतील बियाण्यांवर लावला लेकरासारखा जीव

हेही वाचा -'बीजमाता’ राहीबाई पोपरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात झोट्याशा झोपडीत राहिबाई पोपेरे राहतात. अशिक्षित राहीमावशींना सुरुवातीपासूनच जेमतेम दोन ते तीन एकर जमीन आहे. भात आणि वेगवेगळ्या भाज्या हेच पिकवून त्यावर उदरनिर्वाह करतात. भाज्या, फळ आणि विविध प्रकारचे धान्यांचे वाण साठवण्याची राहिमावशींना सुरवातीपासून आवड होती. त्यानुसार त्यांनी खूप धडपड केली. त्या म्हणत, लोकांनी संकरीत असलेला वाण न खाता गावरान वाणाचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. असे केल्याने माणूस निरोगी राहत असल्याच विश्वास राहीमावशीच्या मनात साठलेला होता. या विश्वासामुळे आज लोप पावत चाललेल्या अनेक पिकांच्या मुळ वाणांचे जतन राहिमावशीने केले आहे. भात, घेवडा, नागली, वरई, उडीद, वाटाणा, तूर अशी वेगवेगळी पीकं, भाज्यांच्या 52 वाणांचा अमुल्य ठेवा आज राही मावशींच्या बियाण्यांच्य बँकेत आहे. केवळ हायब्रीड पदार्थ खाल्ल्याने आज माणसांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे त्या सांगतात.

संकरीत दिसायला चांगले असलं तरी शरीरासाठी चांगले नाही हे राही मावशी पोटतीडकीने लोकांना सांगतात. त्यामुळे त्यांनी गावरान वाणांचा जतन केलेला ठेवा समाजापर्यंत पोहचायला हवा यासाठी त्या काम करत आहेत. लहानगे निरोगी राहावेत त्यांना सकस अन्न खायला मिळावे या उद्देशाने राहीमावशींनी अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून या पिकांचे वाण सामान्यापर्यंत पोहचवण्याचा ध्यास घेतला आहे. 'बायफ मित्रा' ही सामाजिक संस्थांही यासाठी त्यांची मदत करत आहेत. तसेच राही मावशी यांच्या गावा शेजारील 10 ते 15 गावातील महिला आणि पुरुष राहिमावशीच्या मदतीसाठी पुढे आले आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांनी माठात बियाणे साठवले आहेत. 'बायफ मित्रा' या सामाजिक संस्थेने राहिबाईला हात दिला आणी आता राहिबाईच्या पिकांच्या वाणांसह आदिवासी परीसरातील लोकांकडे असलेल्या अशा 245 प्रकारच्या वाणांची बँक राहीमावशीच्या घरी सुरू झाली आहे. बियाण्यांचा खजिना सर्व सामान्यपर्यंत पोहचावा आणी जनतेला त्याचा फायदा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -घटनात्मक प्रजासत्ताक राष्ट्राची मूल्ये आठवताना...

Last Updated : Jan 26, 2020, 7:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details