महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संगमनेर मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गडाला खिंडार पाडण्यास विरोधक एकवटले - संगमनेर मतदारसंघ बाळासाहेब थोरात विरूद्ध साहेबराव नवले

संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखेंनी तर विखेंच्या शिर्डीत बाळासाहेब थोरांतांनी विरोधकांना बळ देत निवडणुकीत एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे गेली अनेक वर्षे थोरातांची संगमनेर तालुक्यावर असलेली मजबुत पकड सैल करण्यात विरोधक कितपत यशस्वी होतात, हे येत्या 24 ऑक्टोबरलाच स्पष्ट होणार आहे.

संगमनेर मतदारसंघ बाळासाहेब थोरात विरूद्ध साहेबराव नवले

By

Published : Oct 18, 2019, 12:53 PM IST

Updated : Oct 18, 2019, 5:26 PM IST

अहमदनगर -जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा असलेला संगमनेर मतदारसंघ. या मतदारसंघातून गेली सात टर्म बाळासाहेब थोरात विधानसभेवर निवडून गेले आहेत. यावेळीही थोरातांनी विजयासाठी कंबर कसली आहे, तर शिवसेनेने साहेबराव नवलेंना त्यांच्या विरोधात मैदान उतरवले आहे.

संगमनेर मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गडाला खिंडार पाडण्यास विरोधक एकवटले

हेही वाचा... हर्षवर्धन जाधवांना 'ते' विधान भोवले; आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील पहिल्या मंत्री मंडळाच्या स्थापनेपासुनच सत्तेत आणि मंत्री पदावर नेहमीच संगमनेर तालुक्यातील व्यक्ती राहिली आहे. काँग्रेसला नेहमी साथ देणाऱ्या बाळासाहेब थोरांना काँग्रेसच्या पडझडीच्या काळात पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचाराच्या रणधुमाळीत राज्यातील प्रचार सभा करत थोरांतांना त्यांच्या मतदारसंघातही प्रचार करावा लागत आहे. तालुक्यातील उत्तम चालणाऱ्या संस्था आणि मागील कालावधीत सातत्याने केलेल्या विकासकामांवर थोरांतांनी प्रचार सुरु केला आहे.

हेही वाचा... विकासासाठी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, खडसेंची खदखद

बाळासाहेब थोरात आणि राधाकूष्ण विखे यांचा मतदारसंघ शेजारी-शेजारीच. इतकेच नाही तर बाळासाहेब थोरातांचे मतदान देखील विखेंच्या मतदारसंघात आहे. विखे आणि थोरात यांच्यात नेहमी राजकीय संघर्ष राहिला आहे. आता तर बाळाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव सुजय भाजपमध्ये गेल्यानंतर तो आणखी वाढला आहे. या निवडणुकीत विखे पिता-पुत्रांनी संगमनेर मतदारसंघातच जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. थोरातांच्या विरोधकांची मोठी मोट बांधत या वेळी उद्योजक साहेबराव नवलेंना शिवसेनेकडून मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत नवले देखील त्यांच्या उद्योग समुहाच्या माध्यातून असलेला जनसंपर्क आणि विखेंच्या साथीवर ही निवडणूक लढवत आहेत. नवले सध्या संगमनेरमधील एम.आय.डी.सी आणि निळवंडे धरणाचे पाणी हे प्रमुख मुद्दे घेत प्रचार करत आहेत.

Last Updated : Oct 18, 2019, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details