अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आलेल्या 83 स्त्राव नमुन्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. यापैकी ८२ अहवाल निगेटिव्ह आले असून एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यक्ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याची सहिवासी आहे. आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीला लागण झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिलीय.
नगरमध्ये आणखी एक 'पॉझिटिव्ह'; अद्याप ८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आलेल्या 83 स्त्राव नमुन्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. यापैकी ८२ अहवाल निगेटिव्ह आले असून एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आज सकाळपर्यंत एकूण ८५ स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून त्यांचे अहवाल अद्याप पेंडिंग आहेत. सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २६ झाली असून यात एकजण बीडचा आहे. तसेच अन्य एक व्यक्ती मूळची श्रीरामपूर तालुक्यातील असून ते पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर यांनी दिलीय.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ८७३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील २५० जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे आतापर्यंत ८४४ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, ७२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तसेच एकूण ४६६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.