महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रीरामपुरात विजेचा शाॅक लागून एकाचा मृत्यु

भाऊराव लक्ष्मण चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेवर बेलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीरामपुरात विजेचा शाॅक लागून एकाचा मृत्यु
श्रीरामपुरात विजेचा शाॅक लागून एकाचा मृत्यु

By

Published : Mar 13, 2021, 1:02 PM IST

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूरमध्ये विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. भाऊराव लक्ष्मण चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेवर बेलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील भाऊराव लक्ष्मण चव्हाण हे सायंकाळी घराबाहेरील रस्त्याने जात असताना वीजेच्या तारेला त्यांचा स्पर्श झाला. यावेळी त्यांना वीजेचा जोरदार शाॅक लागला. त्यामुळे गंभीर अवस्थेत त्याला तातडीने उपचारांसाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार हाॅस्पीटल येथे दाखल करण्यात आले. तेथे, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. त्याचे वय अवघे 26 वर्षांचे असुन त्यास 3 मुली आहेत. त्याची पत्नी गरोदर असल्याने माहेरी गेली होती. बेलापूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली असुन पुढील तपास हवालदार अतुल लोटके हे करत आहे. अचानक झालेल्या दुर्दैवी घटनेने बेलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details