महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांवर हल्ल्याप्रकरणी चार जण अटकेत, न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी

संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीनबत्ती चौकात) जमावाकडून पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. या चौघांना संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

संगमनेर पोलीस ठाणे
संगमनेर पोलीस ठाणे

By

Published : May 8, 2021, 8:33 PM IST

Updated : May 8, 2021, 10:34 PM IST

अहमदनगर -संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीनबत्ती चौकात) जमावाकडून पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. या चौघांना संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना पोलीस प्रशासनाकडून कडक समज देण्यात येत होती. गुरुवारीही (6 मे) सायंकाळच्यावेळी काही नागरीक विना मास्क, सामाजिक अंतर या नियमांचे उल्लंघन करत फिरतांना दिसत होते. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकातील पोलीस कर्मचार्‍यांना नियम पाळा, घरी जा, असे सांगत असताना पोलीस व काही नागरीकांमध्ये बाचाबाची झाली. त्यातूनच पोलिसांवरील हल्ल्याची घटना संगमनेर शहरतील तीनबत्ती चौकात घडली होती. यानंतर हल्लेखोरांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, संगमनेरातील या घटनेने संगमनेरच्या कायदा व सुव्यवस्थेला काळीमा फासला आहे.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी संगमनेरमध्ये येवून दिलेल्या इशार्‍यानंतर शुक्रवारी (दि. 7 मे) रात्री पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन अनेकांची ओळख पटविली आहे. तर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी छापे टाकून मुसेब अलाउद्दिन शेख (वय 31 वर्षे, रा. अपनानगर), आसिफ मेहबूब पठाण (वय 31 वर्षे, मोगलपुरा), सय्यद युनूस मन्सूर (वय 24 वर्षे, गवंडीपुरा), मोसीन इमाम शेख (वय 35 वर्षे, रा. जम्मनपुरा) या चौघांना अटक करत त्यांना आज (दि. 8 मे) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने चौघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -श्रीरामपूर; कोरोना चाचणीचे साहित्य उघड्यावर फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Last Updated : May 8, 2021, 10:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details