अहमदनगर- गेल्या चोवीस तासात 359 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा दहा हजार पार गेला आहे. जिल्ह्यात सोमवारी ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ६४७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६५.९३ टक्के इतकी आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३२३ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१, अँटीजेन चाचणीत १६५ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१, नगर ग्रामीण ०७, कँटोन्मेंट ०४, पारनेर ०५, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत १६५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, संगमनेर २६, राहाता १५, पाथर्डी २९, नगर ग्रामीण १३, श्रीरामपुर १०, श्रीगोंदा १४, पारनेर ०५, अकोले ०३, राहुरी ०९, कोपरगाव ०८, जामखेड १० आणि कर्जत २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.