महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहपरिवार साईचरणी नतमस्तक, पाहा व्हिडिओ - साई चरणी नतमस्तक

Shivraj Singh Chouhan In Shirdi : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतलं. आमचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश असाच पुढे चालत राहो, अशी प्रार्थना साईचरणी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

shivraj singh chouhan visited sai baba temple in shirdi
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहपरिवार साई चरणी नतमस्तक

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 9:04 AM IST

शिर्डी Shivraj Singh Chouhan In Shirdi :आजपासून नवीन वर्ष 2024 सुरू झालं आहे. अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात नव्या उत्साहानं करत आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या या काळात दर्शनाची लगबग सुरू आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन वर्षानिमित्त सहपरिवार शिर्डीत साई दरबारी हजेरी लावली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या परिवारासह साईबाबांचे दर्शन घेतले.

new year celebration at shirdi former MP CM shivraj singh chouhan visited sai baba temple Devotees throng watch video

दरवर्षी दर्शनासाठी शिर्डीला येतात शिवराज सिंह : शिवराज सिंह चौहान हे दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. यंदाही ते आपल्या कुटुंबासह साई चरणी नतमस्तक झाले. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही साईबाबांकडे मध्यप्रदेशच्या जनतेसह देशातील तमाम देशवासीयांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. सर्वांच मंगल होवो, कल्याण होवो, आपला देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रगती करो. तसंच आमच्या मध्यप्रदेशला कधीकाळी आजारी राज्य म्हणून ओळखलं जायचं. मात्र आज मध्य प्रदेश हे प्रगतशील राज्यांपैकी एक आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश असाच पुढे चालत राहो, अशी प्रार्थना केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आज पुन्हा घेणार दर्शन : पुढं ते म्हणाले की, नवीन वर्षात रामलल्ला विराजमान होत असून रामराज्य येत आहे. त्यामुळं आमचं सर्वांचं मन गर्वानं आणि उत्साहानं भरलंय. दरम्यान, शिवराज सिंह यांनी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थानतर्फ त्यांचा शाल आणि साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवराज सिंह यांच्या समर्थकांनी 'देश का नेता कैसा हो शिवराज सिंह जैसा हो' अशी घोषणाबाजी केली. तसंच मिळालेल्या माहितीनुसार शिवराज सिंह आज (1 जानेवारी) पुन्हा एकदा साईबाबांचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर ते शनिशिंगणापूरला जाऊन शनिदेवाचं दर्शन घेणार आहेत.

शिर्डीत भाविकांची गर्दी : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी, यासाठी लाखो भाविकांनी साईदरबारात हजेरी लावली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भाविकांनी साईनामाचा जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी मंदिर ट्रस्टकडून आयोजित करण्यात आलेल्या साई भजन-किर्तनाच्या कार्यक्रमात साईभक्त तल्लीन होताना दिसले. तसंच मंदिर रात्रभर खुलं असल्यानं लाखो भाविकांना साईबाबांचं दर्शन करता आले. दरम्यान, नववर्षानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळं मंदिर आणि मंदिर परिसर उजाळून गेल्याचं पाहायला मिळालं. तसंच साईमंदिरात आणि मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.


हेही वाचा -

  1. नववर्षाच्या स्वागतासाठी साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, पाहा व्हिडिओ
  2. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल, साई मंदिर आज राहणार रात्रभर खुलं
  3. साईबाबांच्या दर्शनाकरिता गुरूभक्तांची गर्दी ; दत्तजयंतीनिमित्त राज्यभरातून 140 पालख्या शिर्डीत दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details