शिर्डी- साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची दिवसेंदिवस गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक वेळा तर भाविकांना दर्शन रांगेत तासंतास ताटकळत उभे राहून घ्यावे लागत आहे. मात्र, भक्तांचा हा त्रास येत्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये कमी होणार आहे.
दिपक मुंगळीकर- कार्यकारी अधिकारी, साई संस्थान हेही वाचा -अभिनेते महेश बाबू, सोनू सूद यांनी घेतले साईंचे दर्शन
साईबाबा संस्थानने विमानतळासारख्या सुविधा देणारे अद्यावत दर्शनबारीचे काम सुरू केले असून ते मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत दाखल होईल. भाविकांचे दर्शन सुलभ आणि आनंददायी व्हावे, यासाठी संस्थानच्यावतीने सुसज्ज दर्शनबारी प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी ११२.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे.
दर्शनरांगेसाठी चालू असलेल्या कामांचे ग्राफिक्स या इमारतीमध्ये तीन भव्य प्रवेश हॉल असून यामध्ये एकाच वेळी एकूण 27 हजार साईभक्तांची व्यवस्था होणार आहे. यामध्ये प्रथमोपचार कक्ष, मोबाईल व चप्पल लॉकर्स, बायोमेट्रिक पास, सशुल्क पास, लाडू विक्री, उदी व कापडकोठी, बूक स्टॉल, डोनेशन ऑफिस, चहा कॉफी काऊंटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र असे स्वच्छता गृहे, उदवाहक, पिण्याचे पाणी, वायुविजन इत्यादी व्यवस्था असणार आहे.
दर्शनरांगेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम २० हजार ८२ चौ.मी. असून तळमजला ६ हजार ५८१.६० चौ.मी आहे. यात पहिला मजला ६ हजार १३३.०२ चौ.मी. तर, दुसरा मजला ६ हजार १३३.०२ चौ.मी.आहे.
दर्शनरांगेसाठी चालू असलेल्या कामांचे ग्राफिक्स हेही वाचा -नगर जिल्हा परिषद निवडणूक; विखे-थोरातांसाठी वर्चस्वाचा 'सामना'
या दुमजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर सहा असे एकूण बारा वातानुकूलीत हॉल असतील. एका हॉलची क्षमता दीड ते दोन हजार भाविकांची असेल. भाविकांना चहा, कॉफी, बिस्किटे मोफत असतील, वॉश रूमसह सर्व सुविधा येथे असणार आहेत.