महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात नव्या 165 रुग्णांची नोंद ; तर 100 बाधित कोरोनामुक्त - ahmednagar corona report

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 165 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन आढळलेल्या कोरोना रुग्णांत टेस्ट लॅबमध्ये 41 तर खासगी प्रयोगशाळेत व पोर्टलवर 83 रुग्णांची नोंद झाली. तसेच अँटीजेन चाचण्यात 41 रुग्ण बाधित आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या 2 हजार 192 इतकी झाली आहे.

अहमदनगर कोरोना अपडेट
अहमदनगर कोरोना अपडेट

By

Published : Jul 22, 2020, 6:51 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 165 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून, मंगळवारी दिवसभरात 100 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 233 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवीन आढळलेल्या कोरोना रुग्णांत टेस्ट लॅबमध्ये 41 तर खासगी प्रयोगशाळेत व पोर्टलवर 83 रुग्णांची नोंद झाली. तसेच अँटीजेन चाचण्यात 41 रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 915 इतकी झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 2 हजार 192 इतकी झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये 41 रुग्ण आढळले आहेत. नगर तालुक्यात 3 तर नगर शहरात 13 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये राहाता तालुक्यातील साकुरी येथे 3, पारनेर तालुक्यात 4 रुग्ण आढळले असून, ढवळपुरी २, सारोळा आडवाई 1, किन्ही 1 यांचा त्यामध्ये समावेश आहे. श्रीगोंदे तालुक्यात 13 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये घोगरगाव 4, काष्टी 1, चिकलठाणवाडी 1, चांडगाव 1, कोळगाव 1, देवदैठण 3, घारगाव 2 यांचा समावेश आहे. पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. शेवगाव तालुक्यातील मंगरुळ येथे 1 व शेवगाव शहरात 1 रुग्ण आढळला. श्रीरामपूरमध्येही 2 रुग्णांची नोंद झाली.

याशिवाय, जलदगतीने कोरोना निदान करण्यासाठी आता अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यामधून 41 जण बाधित आढळले. त्यात श्रीरामपूर 9, नेवासा 16, कोपरगाव 2, संगमनेर 10, कॅन्टोन्मेंट 1, मनपा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 83 रुग्णांची नोंद झाली आहे. नगर शहरात आता नव्याने आयुर्वेद कॉलेज येथे कोविड रुग्णालय सुरू झाले आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार होणे अधिक सुलभ होणार आहे. नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ग्रामीण भागातही वाढत आहे. जिल्ह्यातील कर्जत, शेवगाव, पाथर्डी, जामखेड आदी तालुक्यातील व्यवहार सध्या ठप्प आहेत. तेथे कोरोना आटोक्यात येण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details