अहमदनगर - राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत आता शिर्डीच्या साईबाबा संस्थाननेही सहभाग घेतला आहे. यासाठी संस्थानने लिंबाच्या झाडाची तब्बल पन्नास हजार रोपे तयार केली आहेत. या रोपांच्या मोफत वाटपास आज साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी हावरे यांनी शहरातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड करण्याचे आवाहनही केले आहे.
शिर्डी साई संस्थानाचाही 13 कोटी वृक्ष लागवडीत सहभाग; 1 हजार रोपांचे केले वाटप - गुरुस्थान मंदीर
राज्य सरकारच्या १३ कोटी झाडे लावण्याच्या मोहिमेत आता शिर्डीच्या साईबाबा संस्थाननेही सहभाग घेतला आहे. यासाठी संस्थानने लिंबाच्या झाडाची तब्बल पन्नास हजार रोपे तयार केली आहेत.
शिर्डी साई संस्थानच्या वतीने लिंब वृक्षांच्या 1 हजार रोपांचे वाटप
याच बरोबरीने शिर्डीतील साईबाबांच्या गुरुस्थान मंदीराजवळील लिंब वृक्ष पवित्र समजला जातो. या वृक्षापासून लिंबांच्या 100 रोपांची निर्मीती करण्यात आली आहे. ती रोपे देशभरातील साईमंदिरांना दिली जाणार आहेत. याच बरोबरीने शिर्डीत साई समाधी मंदिराशेजारी भक्तांच्या ध्यान धारनेसाठी उभारण्यात आलेल्या ध्यान कक्षाचेही आज अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.