अहमदनगर - किती दिवस सहन करायचे आता पुरे झाले, कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात शेतकऱ्यांच्यावतीने मी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरमधील जनसंवाद यात्रेत दिला. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर विधानसभा मतदारसंघातुन काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप नगर तालुक्यातील आरणगाव येथे झाला.
कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात गुन्हा दाखल करणार - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारच्या विविध घोषणांवर बोलताना हे फसवणीस सरकार असल्याची टीका केली आहे. त्या अहमदनगर येथील एका कार्यक्रमात बालत होत्या.
संवाद यात्रेची सुरूवात पारनेर तालुक्यातील निघोज येथून झाली होती. यावेळी बोलताना सुळे यांनी फडणवीस सरकारच्या विविध घोषणांवर बोलताना हे फसवणीस सरकार असल्याची टीका केली. शेतकरी कर्जमाफीवरही सुळे यांनी टीकेची झोड उठवली. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना घरबसल्या आम्ही सरसकट कर्जमाफी दिली होती. त्यासाठी आतासारखी ऑनलाईन आणि जोडीने शेतकऱ्यांना उभे नव्हते केले, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी विधानसभेसाठी उमेद्वार म्हणुन इच्छुक असणारे पारनेर मतदारसंघाचे निलेश लंके म्हणाले, तालुक्यात पाणी, बेरोजगारी हा प्रश्न मोठा असून ते सोडवण्याचे काम करू.