अहमदनगर - राज्यात लक्षवेधी असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात आज शरद पवार यांनी जाहीर प्रचाराची सांगता सभा घेत राज्यात परिवर्तन करण्याचे आवाहन जनतेला केले. कर्जतमधील सभेत हजारोच्या संख्येने आलेले कार्यकर्ते आणि त्यांचा उत्साह पाहुन रोहित पवार यांचा विजय होणार असल्याचे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
आता 'लोकांचंच ठरलंय', कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारच - शरद पवार - कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारच
२४ तारखेनंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात 'राम' शिल्लक राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. या मतदारसंघातील निवडणूक ही तरुणांनी हातात घेतली असून भाजप नेत्यांची झोप उडाली आहे.
हेही वाचा -महाराष्ट्राच्या डोक्यावर शरद पवारांची 'छत्री', राष्ट्रवादीचे कार्टुन
२४ तारखेनंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात 'राम' शिल्लक राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. या मतदारसंघातील निवडणूक ही तरुणांनी हातात घेतली असून भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना या मतदारसंघात तीन-तीन सभा घ्याव्या लागतात. मात्र, आता एकूणच राज्यातील जनता बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बंद पडत असलेले उद्योग या गोष्टींमुळे सरकारवर नाराज असून आता जनतेने परिवर्तन विकासासाठी करावे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. आता 'जनतेतच ठरलंय' त्यामुळे रोहित पवार यांचा विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.