अहमदनगर - शहरातील तोफखाना परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केटमधील गाळ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळी या कारवाईला सुरुवात झाली.
शहरातील अनधिकृत शरण मार्केटवर मनपाचा बुलडोझर; एकशे तीन गाळे जमीनदोस्त - नगरविकास विभाग
या परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती.
अनधिकृत शरण मार्केट जमीनदोस्त करताना बुलडोजर
या परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. त्यावर लोकायुक्तांनी सुनावणी केली आणि कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, कारवाई होत नसल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांकडून लोकायुक्तांनी अहवाल मागवला होता. त्यामुळे मनपाने शुक्रवारी सकाळी कारवाईला सुरुवात केली.
या कारवाईत सुमारे १०३ गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये या मार्केटवर कारवाई सुरू केली आहे.