अहमदनगर - दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवार पासून जोरदार पाऊस सुरू आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १२ हजार ८७३ दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला आहे. शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी धरण ४९.५१ टक्के भरले.
अहमदनगर : मुळा धरण ५० तर भंडारदरा धरण 60 टक्के भरले; कोतूळला ३६५ मिलिमीटर पावसाची नोंद - अहमदनगर पाऊस बातमी
कोतूळ येथून मुळा धरणाकडे ६ हजार २६० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गुरुवारी मुळा धरणाकडे २१४ दशलक्ष घनफूट नव्याने पाणीसाठा जमा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुळा धरणात ५ हजार ८८२ दशलक्ष घनफूट नव्याने पाणी साठा जमा झाला.
कोतूळ येथून मुळा धरणाकडे ६ हजार २६० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गुरुवारी मुळा धरणाकडे २१४ दशलक्ष घनफूट नव्याने पाणीसाठा जमा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुळा धरणात ५ हजार ८८२ दशलक्ष घनफूट नव्याने पाणी साठा जमा झाला. मुळा धरणात शनिवारी सकाळपर्यंत १३ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
भंडारदरा 60 टक्के भरले-
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान असलेले भंडारदरा धरणही साठ टक्के भरले आहे. मागील 24 तासात भंडारदरा धरणाच्या पाण्यात 609 घनफूट पाणी वाढले आहे. वाकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. 122 क्यूसेकने पाण्याचा प्रवाह प्रवरा नदीपात्रात वाहत आहे. मागील 24 तासात घाटघर येथे 170, रतनवाडी येथे 169, पांजरे येथे 130, भंडारदरा येथे 127 तर वाकी येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच निळवंडे धरणात ही सध्या 5035 दशलक्ष घनफूट साठा जमा झाला आहे.