केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी पत्रकार परिषदेत बोलताना शिर्डी (अहमदनगर): भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मोठे विधान केले आहे. हिंदुराष्ट्र व हिंदूराज हे दोन वेगळे विषय आहेत. भारतात ऐंशी ते नव्वद टक्के हिंदू राहतात. येथे हिंदू समाज बहुसंख्य असल्याबाबत कुणाचेही दुमत नाही. त्यामुळे भारत हिंदूराष्ट्र होते, आहे व पुढेही राहील, असे वक्तव्य भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शिर्डीत केले आहे. नकवी यांनी सहकुटुंब आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले.
मुख्तार अब्बास नक्वींची मागणी : माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी पाणी तसेच वीज आदी मोफत देण्याची स्पर्धा एका पक्षासाठी मर्यादित नाही. निवडणूक जाहीरनाम्यातील मोफत वाटपाच्या या घोषणा मतदारांना मतांसाठी दाखवलेली लालच किंवा लाच आहे. त्यामुळे यावर नियंत्रण व बंदी यायला हवी, असे मत नकवी यांनी व्यक्त केले. निवडणुक जाहिरनाम्याचे ऑडीट व्हायला हवे. निवडणुक जाहिर होण्याअगोदर व नंतरही त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मोफत वाटण्याच्या मजबुरीतून अनेक राज्ये कर्जे काढत आहेत हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकप्रियता कमी होणार नाही: साईबाबांच्या विषयी समाज माध्यमांवर पोष्ट टाकण्यात येतात. त्याबाबत बोलतांना नक्वी म्हणाले की, सोशल मिडीयातील अॅन्टी सोशल अॅक्टीव्हीटीवर लक्ष देण्याची गरज नाही. यामुळे साईबाबांच्या लोकप्रियतेवर व विश्वासाहर्तेवर कोणताही परिणाम होणार नाही. पंतप्रधान मोदींचीही जगभर लोकप्रियता आहे. मात्र त्यांच्या विषयीही काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून दुष्पप्रचार करतात. मात्र त्याने त्यांची लोकप्रियता व विश्वासहर्ता कमी होणार नाही, असा विश्वासही नक्वी यांनी व्यक्त केला आहे.
इतिहासात छेडछाड केली जात नाही: देशातील काही शहरांची आणि गावांची नावे बदली जात आहेत तर काहींची नावे बदल्यांची मागणी केली जात आहे. यावर बोलताना माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की इतिहासात काही छडछाड केली जात नाही. केवळ गाळलेल्या जागा भरल्या जात असल्याचे नक्वी शिर्डीत म्हणाले आहेत. जिथे कुठे विदेशी ओळख असेल तर तिथे स्वदेशी जाण असली पाहिजे. इतिहास हा सुरूवातीपासूनच वेगवेगळ्या वेळी लोकांनी मोडून तोडून आणि आपल्या सुविधेनुसार लिहिला आहे. यात काही राजकारण आहे, असे मला वाटत नसल्याचे नक्वी म्हणाले आहेत.
हेही वाचा:IAS VS IPS In Karnataka: महिला आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमधील भांडण आलं समोर.. राज्य सरकारने दोघींचीही केली बदली