अहमदनगर - शेतात पाणी भरताना विद्युत मोटारीच्या वीज प्रवाहाचा धक्का बसून माय-लेकांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी अकोले तालुक्यातील गर्दणी शिवारात घडली.
शेतात विजेचा धक्का लागल्याने मायलेकांचा मृत्यू;अकोले तालुक्यातील गर्दणी शिवारातील घटना - मॉर्डन हायस्कुलचे
मुळगाव गर्दणी येथील शेतातील उसाला पाणी देण्यासाठी मायलेक संध्याकाळी शेतावर गेले होते. यावेळी मोटारीच्या खोक्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का मुलाला बसला. त्याला वाचवण्यासाठी आई संगीता यांनी त्याला हात लावताच त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचा मृत्यू झाला.
संगिता दिलीप झोळेकर (वय ४२) व आविष्कार दिलीप झोळेकर (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. मूळगाव गर्दणी येथील शेतातील उसाला पाणी देण्यासाठी अविष्कार व त्याची आई हे दोघेही संध्याकाळी शेतावर गेले होते. यावेळी मोटारीच्या खोक्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का अविष्कारला बसला. त्याला वाचवण्यासाठी आई संगीता यांनी त्याला हात लावताच त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचा मृत्यू झाला.
दोघांना त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा व आईचा एकाचवेळेस असा करुण अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संगीता झोळेकर या अकोले येथील मॉर्डन हायस्कूलचे शिक्षक दिलीप झोळेकर यांच्या पत्नी आहेत.