अहमदनगर -उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पाणलोटात मान्सून सक्रिय झाला आहे. घाटघर, पांजरे, रतनवाडीत आर्द्राच्या सरी जोरदार कोसळत असल्याने डोंगर कड्यांवरील धबधबे कोसळू लागले आहेत. ओढे नाले खळखळू लागले आहेत. त्यामुळे लवकरच धरणात नव्याने पाण्याची आवक सुरु होईल.
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय - catchment-area
सह्याद्रीच्या रांगा धुक्यांनी लपेटून गेल्या आहेत. अधुनमधून पडणाऱ्या सरींमुळे गारवा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने काहीसा जोर धरल्याने भात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. काल दिवसभरही पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होता. मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
सह्याद्रीच्या रांगा धुक्यांनी लपेटून गेल्या आहेत. अधुनमधून पडणाऱ्या सरींमुळे गारवा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने काहीसा जोर धरल्याने भात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. काल दिवसभरही पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होता. मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुळा नदीवरील पहिला अंबित लघुपाटबंधारे तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. मुळा नदी वाहू लागल्याने मुळा नदीवरील आंबीत पाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने मुळा नदी वाहू लागली आहे. नदीच्या उगमावरील आंबीत प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने नवीन पाण्याची आवक आता पिंपळगावखांड धरणात सुरु झाली आहे. पिंपळगावखांड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. धरणातील सांडव्या वरून पाणी नदीपात्रात प्रवाहित होते. पुढे ते अकोले- संगमनेर तालुक्याचे लाभ क्षेत्रातून राहुरीला मुळा धरणात जमा होते. मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरु होण्यासाठी अजून काही दिवसाचा कालावधी लागणार आहे.