महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी साईबाबांच्या मंदिर परिसरात मॉक ड्रिल

सोमवारी साईबाबा मंदिर परिसरात काही एनएसजी कमांडो पथकाने मॉक ड्रिल केले. या परिसरात रात्री अकरा वाजल्यानंतर हे प्रात्यक्षिक करण्यात आले.

By

Published : Dec 3, 2019, 6:44 AM IST

Updated : Dec 3, 2019, 7:38 AM IST

mock-drill-of-nsg-commando-squad-in-shirdi-saibaba-temple-area
शिर्डी साईबाबांच्या मंदिर परिसरात मॉक ड्रिल

अहमदनगर -सोमवारी रात्री साईबाबांची शेजारती झाल्यानंतर अकरा वाजता मंदिर परिसरात एनएसजी कमांडोंच्या पथकाने चार तास मॉक ड्रिल केले. यामध्ये दहशतवादी हल्ल्यावेळी कशा प्रकारे कारवाई करावी, यासाठी प्रात्यक्षिक करण्यात आले. शिर्डीच्या साईबाबा मंदिराला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सरावाच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक करण्यात आले. मॉक ड्रिलदरम्यान सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची कारवाई करण्यात आली.

शिर्डी साईबाबांच्या मंदिर परिसरात मॉक ड्रिल

रात्री अकरानंतर मंदिर परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. येथे विविध भागात दहशतवादी लपल्याचे प्रसंग तयार करण्यात आला होता. त्यांच्या विरोधात कारवाई सुरु करण्यात आली. मंदिर परीसरात एनएसजीच्या कमांडोंनी अत्याधुनिक हत्यारांसह अंधारात लपलेल्या सात दहशतवाद्यांचे शोधकार्य सुरू केले. यावेळी दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या काही जणांची सुटकाही करण्यात आली. काहींच्या अंगावर लावण्यात आलेली स्फोटके एनएसजीच्या बॉम्बविरोधी पथकाने निष्क्रिय केली. या परिसरात लपलेल्या सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालत कार्यवाही फत्ते केली.

Last Updated : Dec 3, 2019, 7:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details